Mumbai Tak /बातम्या / IND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवाची 5 प्रमुख कारणे? जाणून घ्या
बातम्या स्पोर्ट्स

IND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवाची 5 प्रमुख कारणे? जाणून घ्या

India vs Australia Indore Test: इंदुर टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाने 9 विकेट राखून टीम इंडियाचा पराभव केला आहे. टीम इंडियाने (Team India)ऑस्ट्रेलियाला 76 धावांचे लक्ष्य दिले होते. हे आव्हान ऑस्ट्रेलिया 1 विकेट गमावून 19 ओव्हरमध्ये सहज पुर्ण केलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीच्या (WTC Final) फायनलमध्ये जागा बनवली आहे. दरम्यान नागपूर आणि दिल्ली या दोन टेस्ट सामन्यात विजयी ठरलेली टीम इंडिया इंदूरमध्ये (Indore Test) अपयशी कशी ठरली,याची 5 प्रमुख कारणे जाणून घेऊयात. (ind vs aus 3rd test team india loss five reasons in indore test nathan lyon virat kohli rohit sharma)

टॉप ऑर्डर फ्लॉप

टीम इंडियाच टॉप ऑर्डर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले आहेत. सलामी जोडीनंतरही तिसऱ्या व चौथ्या स्थानी उतरणाऱ्या खेळाडूंना देखील मोठी खेळी साकारताना आली नाही. विराट कोहली, शुबमन गिल, कर्णधार रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा हे खेळाडू फ्लॉप ठरत आहेत. रोहित शर्माची (Rohit Sharma) गेल्या दोन सामन्यातील कामगिरी चांगली होती, पण तिसऱ्या सामन्यातील दोन्ही डावात तो फ्लॉप ठरला.

IND vs AUS: टीम इंडियाची विजयाची हॅट्रिक हुकली, ऑस्ट्रेलियाचा पहिला विजय

नाथन लायनच्या फिरकीसमोर शरणागती

ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नाथन लायन (Nathan Lyon)सुरूवातीच्या दोन टेस्ट सामन्यात फारशी अशी कमाल दाखवू शकला नाही. मात्र इंदोर टेस्टमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. टीम इंडियाच्या पहिल्या डावात 3 विकेट तर दुसऱ्या डावात त्याने एकट्याने 8 विकेट घेतल्या. अशाप्रकारे त्याने तिसऱ्या टेस्टमध्ये 11 विकेट काढले आणि तो या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच बनला.

खेळपट्टीची महत्वाची भूमिका

तिसऱ्या टेस्ट सामन्यात खेळपट्टीने मोलाची भूमिका बजावली आहे. पहिल्या दिवसांपासून खेळपट्टीवर खुप टर्न पाहायला मिळाला. त्यामुळेच टीम इंडियाचे खेळाडू मैदानावर टीकू शकला नाही. आणि टीम इंडियाचा पहिला डाव गडगडला होता.याचा अर्थ असाही नाही आहे की, या खेळपट्टीवर फलंदाजी करता येणार नाही. उस्मान ख्वाजा, चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)सारख्या खेळाडूंनी याच खेळपट्टीवर अर्धशतक ठोकलं आहे.

जडेजा-अश्विन आणि अक्षर फलंदाजीत नापास

नागपूर आणि दिल्ली टेस्टमध्ये आपल्या बॉलिंग आणि बॅटींगने चमकदार कामगिरी करणारे रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल सारखे खेळाडू इंदूर मध्ये सपशेल अपयशी ठरले. अश्विन आणि जडेजाने गोलंदाजीत कमाल केली मात्र फलंदाजीत ते फारशी कमाल दाखवू शकले नाही.

IND vs AUS 3rd Test Day 3 : टीम इंडियावर पराभवाचं संकट,ऑस्ट्रेलियाला पहिल्या विजयाची आशा

आत्मविश्वास नडला

दिल्ली आणि नागपूर टेस्टमध्ये मोठा विजय मिळवून टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला होता. चार सामन्यांची कसोटी मालिका 4-0 ने जिंकू असा खेळाडूंचा आत्मविश्वास होता. मात्र हाच आत्मविश्वास टीम इंडियाला इंदूरमध्ये नडला आहे.

दरम्यान आता 4 टेस्ट सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-2 ने आघाडी घेतली आहे. आता चौथा टेस्ट सामना निर्णायक असणार आहे. हा सामना 9 मार्चला रंगणार आहे.हा सामना जिंकून ऑस्ट्रेलिया बरोबरी साधते की टीम इंडिया (Team India) 3-1 ने मालिका खिशात घालते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बाबाची एकच चर्चा!गरम तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद Palak Tiwari: पलक तिवारीच्या बोल्ड लुकची एकच चर्चा प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या इजिप्तमधल्या गर्लफ्रेंडसोबत सीक्रेट वेडिंग, आता अभिनेता बनला पिता…. IPL five new rules : आता आणखी मजा येणार, पाच नवे नियम आयपीएलचा गेम बदलणार mumbai local mega block today : मुंबईकरांनो, सुट्टीचा प्लान आहे, मग लोकलचे वेळापत्रक जाणून घ्या प्रियकराला विष दिलं नंतर फोनवर म्हणाली, ‘मेला नाहीस तर गळफास घे’ Health Tips: ‘या’ आजारांमध्ये लसूण खाणं ठरू शकतं खतरनाक Janhvi Kapoor: जान्हवीची ग्लॅमरस बोल्ड अदा, पण झाली ट्रोल; यूजर्स म्हणाले प्लॅास्टिक… बागेश्वर बाबासोबत ‘ही’ तरूणी अडकणार लग्नबंधनात? जेव्हा चालू लेक्चरमध्ये विद्यार्थ्याने चक्क बनवला मसाला डोसा, प्राध्यापकही झाले हैराण Kapil Sharma च्या ऑनस्क्रीन गर्लफ्रेंडचा हॉट आणि बोल्ड लूक IPL ची पहिली मॅच केव्हा झालेली? सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू कोण? रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार?