Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर टीम इंडियाचा WTC चा प्रवास खडतर, जाणून घ्या समीकरण

मुंबई तक

Australia Qualified for WTC Final : ऑस्ट्रेलियाने इंदूर टेस्ट सामना 9 विकेटने जिंकून टीम इंडियाचा पराभव केला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी (WTC Final) पात्र ठरली आहे. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे समीकरण पुर्णत बदलले आहे. आता नेमका काय बदल झाला आहे. ऑस्ट्रेलिया तर फायनलमध्ये दाखल झाली आहे, पण टीम इंडियाचं (Team […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Australia Qualified for WTC Final : ऑस्ट्रेलियाने इंदूर टेस्ट सामना 9 विकेटने जिंकून टीम इंडियाचा पराभव केला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी (WTC Final) पात्र ठरली आहे. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे समीकरण पुर्णत बदलले आहे. आता नेमका काय बदल झाला आहे. ऑस्ट्रेलिया तर फायनलमध्ये दाखल झाली आहे, पण टीम इंडियाचं (Team India) काय? टीम इंडियाचा प्रवास खडतर असणार आहे का? चला जाणून घेऊयात. (ind vs aus test big change in wtc points table after australia win know the equation)

असा रगंला सामना

तिसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा (Team India)पहिला डाव 109 धावांत ऑल आऊट झाला. या प्रत्युरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 197 धावा करत 88 धावांची आघाडी घेतली होती. नॅथन लायनच्या गोलंदाजीसमोर टीम इंडियाने गुडघे टेकले आणि दुसरा डाव 163 धावांवर आटोपला. त्यामुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 76 धावांचे माफत लक्ष्य ठेवलं. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 9 विकेट राखून सहज पुर्ण केले आणि मालिकेत पहिला विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया या विजयानंतर WTC च्या फायनलमध्ये दाखल झाली आहे. दरम्यान WTCचे पॉईंट्स टेबल कसं आहे, ते पाहूयात.

IND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवाची 5 प्रमुख कारणे? जाणून घ्या

पॉईंटस टेबल काय सांगतो?

ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Points Table) पॉईंटस टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून पॉईंटस टेबलमध्ये आपले पहिले स्थान निश्चित केले आहे. तसेच ऑस्ट्रेलिया लंडनमधील ओव्हल येथे 7 जुनपासून खेळवल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरली आहे. सध्या पॉईंटस टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया 11 सामन्यात 68.52 गुणासह ते पहिल्या स्थानावर आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp