T20 WC: ‘रोहितला ओपनिंगला का नाही पाठवलं?’, सुनील गावसकर प्रचंड संतापले
दुबई: टी-20 विश्वचषकात टीम इंडियाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास धुसर झाल्या आहेत. दुबईत रविवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा आठ गडी राखून पराभव केला. याआधी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या सामन्यात सलामीची जोडी बदलण्याची […]
ADVERTISEMENT

दुबई: टी-20 विश्वचषकात टीम इंडियाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास धुसर झाल्या आहेत. दुबईत रविवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा आठ गडी राखून पराभव केला. याआधी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या सामन्यात सलामीची जोडी बदलण्याची काय गरज होती? असा सवाल गावसकर यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात केएल राहुलसोबत ईशान किशनला ओपनिंगसाठी पाठवण्यात आलं होतं. त्याचवेळी गेली अनेक वर्ष भारतासाठी ओपनिंग करून खोऱ्याने धावा करणाऱ्या रोहित शर्माला तिसऱ्या नंबर पाठविण्याक आलं.
गावसकर ‘आज तक’शी बोलताना म्हणाले, ‘तुम्ही एका युवा खेळाडूला सलामीला पाठवता. तर दुसरी रोहित शर्मासारख्या अनुभवी खेळाडूला तुम्ही खालच्या क्रमांकावर खेळवता. जर रोहित शर्माने स्वत: असं म्हटलं असेल की, त्याला 3 नंबरवर खेळायचे आहे तर गोष्ट वेगळी आहे. पण जर रोहितने स्वत: सांगितलं नसेल की त्याला तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे. तर तर रोहितला पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावरच फलंदाजीसाठी पाठवायला हवं होतं.’
गावसकर पुढे म्हणाले, ‘तुम्ही सलामीची जोडी फोडली आणि नवा खेळाडू त्या जागी पाठवला. त्यानंतर रोहितला नंबर-3 आणि कोहलीला नंबर-4 वर पाठवलं. मला वाटतं हा निर्णय एकट्या कोहलीचा नसून संपूर्ण थिंक टँकचा निर्णय असेल. सुरुवातीला इशान किशनने 70-80 धावा केल्या असत्या तर सर्वांनी हा योग्य निर्णय असल्याचे म्हटले असतं. पण आता निर्णय चुकल्याने तुम्हालाही टीका सहन करावी लागेल.’










