Sanjay राऊतांवर हक्कभंग, पण विधिमंडळाला खासदारावर कारवाई करता येते का?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधिमंडळाबाबत केलेलं एक वक्तव्य चांगलचं वादग्रस्त ठरलं आहे. या वक्तव्यावरुन संपूर्ण राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, आता हे विधान संजय राऊतांना चांगलंच भोवण्याची शक्यता आहे. कारण याच मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) आमदारांनी राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची तयारी सुरु केली आहे. (Infringement motion against sanjay raut in the State Legislature for calling the Legislature a thief)

या दरम्यान, या हक्कभंग प्रस्तावाविषयी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. संजय राऊत यांच्याविरोधात महाराष्ट्र विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव आणता येत नसल्याची माहिती आहे. विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, संजय राऊत राज्यसभेचे खासदार असल्याने त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव चालविण्याचा आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार हा केवळ राज्यसभा सभापती आणि राज्यसभा सचिवालय यांनाच आहे.

Sanjay Raut बोलले अन् सत्ताधारी पेटले… विधानसभेत राडा, मीडियासमोर शिवीगाळ!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्र विधिमंडळ याप्रकरणाबाबत फक्त चौकशी करु शकते. चौकशीदरम्यान यात तथ्य असल्यास त्यांच्यावर प्रस्ताव चालविण्याबाबत राज्यसभा सभापती आणि राज्यसभा सचिवालय यांना प्रस्ताव चालविण्याबाबत आणि कारवाई करण्याबाबत शिफारस केली जाते. त्यानंतर राज्यसभा सचिवालयामार्फत पुढील कार्यवाही केली जाते.

नवीन समिती स्थापन करणार :

दरम्यान, सरकार बदलल्याने विधिमंडळ हक्कभंग समिती बरखास्त झाली आहे. त्यामुळे नवीन हक्कभंग समिती स्थापन करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी विधीमंडळातील सर्व पक्षाकडून या समितीतील सदस्यांपदासाठी नावं मागविली आहेत. तर हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदासाठी अतुल भातखळकर, योगेश सागर, राहुल कुल आणि भरत गोगावले यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. या हक्कभंग समिती समोर संजय राऊत यांना सुनावणीसाठी आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी बोलविण्यात येणार आहे. १० तारखेला त्यांना बोलावलं जाण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

Sanjay Raut Controversy: भाजप-शिवसेना आमदार खवळले! राऊतांविरुद्ध हक्कभंग

ADVERTISEMENT

राहुल नार्वेकरांनीही केलं मान्य :

दरम्यान, राऊतांच्या वक्तव्यावरुन आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात मोठा गोंधळ झाल्याच पाहायला मिळालं. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचं मत वाचून दाखवलं. तसंच, दोन दिवसांत यासंदर्भात चौकशी करुन पुढील निर्णय बुधवारी जाहीर करु असं राहुल नार्वेकर यांनी निवेदनातून सांगितलं. त्यासोबतच निर्णय वाचून दाखवताना सभागृहाचा अवमान झाल्याची टिप्पणीही त्यांनी केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT