बघता बघता तीन मजली इमारत कोसळली; व्हिडीओ झाला व्हायरल

मुंबई तक

जिल्ह्यातील पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात 5 वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेली एक तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. ही घटना सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. भाडेकरूंनी खाली केली होती इमारत पाचोरा शहरातील व्हीपी रस्त्यावर साजेदाबी शेख खलील यांच्या मालकीची हो इमारत होती. साजेदाबी या मुंबईत राहतात. त्यांनी पाचोरा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

जिल्ह्यातील पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात 5 वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेली एक तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. ही घटना सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

भाडेकरूंनी खाली केली होती इमारत

पाचोरा शहरातील व्हीपी रस्त्यावर साजेदाबी शेख खलील यांच्या मालकीची हो इमारत होती. साजेदाबी या मुंबईत राहतात. त्यांनी पाचोरा येथे गुंतवणूक म्हणून ही तीन मजली इमारत बांधली होती. इमारतीला पावसामुळे तडे पडले होते. त्यामुळे इमारत एका दिशेने झुकून कधीही कोसळेल, अशा स्थितीत होती. खबरदारी म्हणून इमारतीतील भाडेकरूंनी इमारत रिकामी केली होती.

इमारती कोसळतानाचा व्हिडिओ व्हायरल

हे वाचलं का?

    follow whatsapp