Jitendra Awhad : “मला व कुटुंबियांना मारण्याचा महेश आहेरचा कट”
jitendra awhad files complaint Against Mahesh aher: ठाण्यात प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेता असा वाद उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली. या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, आता आव्हाडांनी आहेरांविरोधात तक्रार दिली आहे. तक्रारीत जितेंद्र आव्हाड यांनी महेश आहेर […]
ADVERTISEMENT

jitendra awhad files complaint Against Mahesh aher: ठाण्यात प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेता असा वाद उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली. या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, आता आव्हाडांनी आहेरांविरोधात तक्रार दिली आहे. तक्रारीत जितेंद्र आव्हाड यांनी महेश आहेर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
जितेंद्र आव्हाडांनी वर्तकनगर पोलीस ठाणे पोलिसांना तक्रार दिली आहे. महेश आहेर आणि इतर अनोळखी व्यक्तींविरुद्ध भादंवि कलम 108, 108 (अ), 120 (ब), 302, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम 3, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 7, 11, 12, 13 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाडांनी महेश आहेर यांच्यावर काय केले आहेत आरोप?
जितेंद्र आव्हाडांनी तक्रारीत म्हटलेलं आहे की, “मी गृहनिर्माण मंत्री असताना ठाणे महापालिका हद्दीत होत असलेल्या बेकायदा बांधकामांबद्दल व महापालिकेच्या इतर चुकीच्या कार्यपद्धतीबद्दल मला निदर्शनास आणू दिली.”
“आरोपी महेश आहेर हे संदिग्ध व अयोग्य कागदपत्रांच्या आधारावर ठाणे महापालिकेत कार्यरत असल्याबाबत मला माहिती मिळाली. मी त्यांच्याबाबत माहिती घेत असून, आहेरांविरुद्ध भ्रष्टाचाराच्याही तक्रारी आहेत. याबद्दल योग्य कारवाई होण्याबद्दल मी अधिकाऱ्यांना संपर्क करीत असल्यानं आहेर याने माझ्याविरुद्ध आणि माझी मुलगी नताशा जितेंद्र आव्हाड म्हणजेच नताशा अॅलन पटे व तिचे पती अॅलन पटेल यांच्याबद्दल कटकारस्थान रचून घातपात करण्याची दाट शक्यता होती.”










