Crime: महिलेसाठी खुळावला.. घेतला तिच्याच मुलाचा जीव, कल्याणमधील थरारक घटना

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कल्याण: दिवसेंदिवस माणुसकीला काळीमा फासणारे घृणास्पद प्रकार घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतंच, कल्याणमध्येही (Kalyan Crime) असाच प्रकार समोर आला आहे. शाळेतून सुटलेल्या 7 वर्षाच्या चिमुरड्याचा एका तरुणाने जीव घेतला (Murder) असून या हत्येमागचं कारणही अत्यंत धक्कादायक आहे. मृत मुलाच्या आईने लग्नाला नकार दिल्याने तिच्या मित्रानेच चिमुकल्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे. आरोपीने इमारतीच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीत टाकून 7 वर्षाच्या मुलाचा जीव घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम येथील सुंदर रेसिडेंसी इमारतीत ही धक्कादायक घटना घडली आहे.

टीम इंडियाने मुद्दामहून शनाकाचे शतक होऊ दिले? रोहित शर्माने केला खुलासा

प्रणव भोसले असं या चिमुरड्याचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव नितीन कांबळे असल्याचे समजते आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी नितीन कांबळे ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे ज्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत प्रणवचा मृतदेह आढळून आला त्याच इमारतीमध्ये नितीन काही महिन्यांपूर्वी वॉचमनचं काम करत होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “नितीन आणि प्रणवची आई हे दोघे पूर्वी एकाच ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करत असल्याने त्यांची मैत्री होती. नितीनला विधवा असलेल्या कवितासोबत लग्न करायचे होते. मात्र ती नकार देत असल्याने नितीनने तिच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केली.”

कल्याण खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कविता भोसले (प्रणवची आई) नामक महिला ही सात वर्षीय मुलगा प्रणव भोसलेसोबत राहत होती. या महिलेचे इमारतीच्या बी विंगमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या नितीन कांबळे याच्याशी मैत्री होती. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते.

ADVERTISEMENT

यामुळेच दुपारच्या सुमारास नितीनने सात वर्षीय प्रणवला शाळेतून आणले. तो प्रणवला घेऊन थेट गौरीपाडा परिसरातील सुंदर रेसिडेन्सी इमारतीच्या गच्चीवर गेला. तिथे त्याने इमारतीच्या पाण्याच्या टाकीत प्रणवला ढकललं आणि तो तिथून निघून गेला. यानंतर टाकीत बुडून प्रणवचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

प्रणवची हत्या लपवण्यासाठी आरोपी नितीन कांबळेने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. त्यात लिहिलं होतं की, “कविताने 50 हजार रुपये घेतले असून वारंवार मागणी करूनही ती पैसे परत देत नसल्याने मी आत्महत्या करणार. त्याच बरोबर एका महिलेच्या त्रासाला कंटाळून विषारी गोळ्या खाल्ल्याचे सांगत कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात महिलेविरोधात तक्रार करण्यासाठी जात आहे.”

याच दरम्यान आपला मुलगा शाळेतून घरी न परतल्याने घाबरलेल्या कविताने शाळेत चौकशी करून थेट पोलिसात धाव घेत आपल्या मुलाचे नितीन कांबळे याने अपहरण केल्याची तक्रार केली.

अशा परिस्थितीत, पोलिसांना संशय आल्याने आरोपी नितीनला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. यांनतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. सध्या या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून ही हत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT