Kangana Ranaut: कंगना चुकीचंच बोलली, पण 2014 पासून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अनुभव: चंद्रकांत पाटील

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सर्वच स्तरातून आता तिच्यावर टीका सुरु आहे. अशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘कंगनाचं वक्तव्य हे पूर्णपणे चुकीचंच आहे. पण 2014 पासून ज्या प्रकारे सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अनुभव मिळतोय त्यावरुन कंगनाने आपल्या भावना व्यक्त केल्या असतील.’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते.

पाहा चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले:

‘कंगना राणौतच्या भावना काय आहेत ते मला माहित नाही. परंतु वाक्य पूर्णपणे चुकीचं आहे. अशाप्रकारे देशाच्या स्वातंत्र्यावर निगेटिव्ह टिप्पणी करणं याची कोणाला परवानगी नाही.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘परंतु एखाद्या वेळेस मोदींच्या 2014 पासूनच्या कालावधीमध्ये ज्याप्रकारचा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अनुभव मिळतोय प्रामुख्याने सर्वसामान्य माणसांना. दोन वेळचं जेवणच मिळत नाही असा माणूसच या देशात नाही. कारण 105 रुपयात 35 किलो धान्य मिळायला लागलं आहे. घरं, टॉयलेट मोठी यादी आहे.’

‘त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा अनुभव हा 2014 पासून लोकांना मिळायला लागलं असं कंगना राणौतने म्हणणं हे मोदींच्या कालावधीतील कामांवर खुश होऊन म्हणणं बरोबरही आहे. पण त्यासाठी 1947 सालच्या स्वातंत्र्यावर टीका करण्याचा काहीही अधिकार नाही.’ असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

कंगनाने काय केलं होतं वादग्रस्त वक्तव्य?

ADVERTISEMENT

‘सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेते सुभाषचंद्र बोस या लोकांबद्दल बोललो तर या लोकांना माहित होते की रक्त सांडावं लागेल. पण ते हिंदुस्थानी-हिंदुस्थानींचं रक्त सांडू नये.. अर्थातच त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण तेव्हा जे स्वातंत्र्य मिळालं ती भीक होती. आपल्याला खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे.’

या कार्यक्रमात कंगना असंही म्हणाली की, ‘काँग्रेसची सत्ता असताना मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जेव्हा मी राष्ट्रवाद, सैन्य सुधारणा आणि माझ्या संस्कृतीचा प्रचार करते तेव्हा लोक म्हणतात की, मी भाजपचा अजेंडा चालवत आहे. खरं तर हा मुद्दा भाजपचा अजेंडा का असावा.. हा तर देशाचा अजेंडा असला पाहिजे.’ असं वक्तव्य कंगनाने केलं होतं.

Kangana Ranaut: ‘1947 साली स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालं’, कंगनाचं वादग्रस्त विधान

    follow whatsapp

    ADVERTISEMENT