धनंजय मुंडेंविरोधात करुणा शर्मांची पोलीस महासंचालकांकडे तक्रार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. कारण आता त्यांच्या विरोधात करुणा शर्मांनी थेट पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. करुणा शर्मा यांनी आपल्या तक्रारीत अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसंच धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याचीही मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर याआधी रेणू शर्माने आरोप केले होते. नंतर तिने आपली तक्रार मागे घेतली. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्यासोबत सहमतीने असलेले संबंध मान्य केले होते.

रेणू शर्मा यांच्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ येणार का? अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्याने हा विषय संपल्यात जमा होता. अशात आता करुणा शर्मा यांनी अनेक गंभीर आरोप केल्याने धनंजय मुंडेंच्या अडचणीत भर पडली आहे.

काय म्हटलं आहे करुणा शर्मा यांनी तक्रारीत?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मी आपल्याला या तक्रारीद्वारे सांगते आहे की माझे पती धनंजय मुंडे यांनी मला आणि माझ्या मुलांना मागच्या तीन महिन्यांपासून चित्रकूट या बंगल्यात कोंडून ठेवलं आहे. मी 24 जानेवारीला मुलांना भेटण्यासाठी चित्रकुट बंगल्यावर आले होते त्यावेळी 30-40 पोलिसांना बोलवून घेतलं आणि माझ्या मुलांना कोंडून ठेवलं.

मी या तक्रारीद्वारे मागणी करते आहे की विधानसभेतून त्यांना तातडीने बरखास्त केलं जावं. भविष्यात कोणतीही निवडणूक त्यांना लढू देऊ नये. धनंजय मुंडे यांच्या चित्रकुट बंगल्यावर माझी मुलं सुरक्षित नाहीत कारण मुलांकडे लक्ष देण्यासाठी कोणीही महिला केअर टेकर नाहीत. माझ्या मुलांसोबत दारुच्या धनंजय मुंडे काही अश्लील प्रकारही करतात. त्यामुळे माझी मुलं सुरक्षित नाहीत. मला माझ्या मुलांना भेटू दिलं नाही तर 20 फेब्रुवारीपासून मी उपोषणाला बसणार आहे, मला त्यासाठी संमती मिळावी असंही करुणा शर्मा यांनी आता म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT