चार्ल्स ३ हे झाले ब्रिटनचे नवे सम्राट, लंडनच्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये पार पडला राज्याभिषेक

मुंबई तक

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या सिंहासनावर आरूढ होण्याचा मान किंग चार्ल्स थ्री यांना मिळाला आहे. लंडनच्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. किंग चार्ल्स थ्री यांच्या रूपाने आता ब्रिटनला नवा सम्राट मिळाला आहे. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात किंग चार्ल्स ३ यांना ब्रिटनचे नवे सम्राट म्हणून घोषित करण्यात आलं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या सिंहासनावर आरूढ होण्याचा मान किंग चार्ल्स थ्री यांना मिळाला आहे. लंडनच्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. किंग चार्ल्स थ्री यांच्या रूपाने आता ब्रिटनला नवा सम्राट मिळाला आहे. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात किंग चार्ल्स ३ यांना ब्रिटनचे नवे सम्राट म्हणून घोषित करण्यात आलं आहे. किंग चार्ल्स यांनी ब्रिटनचे सम्राट होण्याची औपचारिकता संपवण्यात आली आहे.

लंडनच्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये सोहळा

लंडनच्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये किंग चार्ल्स ३ यांचा राज्याभिषेक झाला. किंग चार्ल्स ३ यांच्या राज्याभिषेकाला उपस्थित असेलल्या लोकांनी राज्याभिषेक झाल्यानंतर चार्ल्स यांना अभिवादन केलं. महाराणी एलिझाबेथ यांनी ७० वर्षे महाराणी म्हणून कारकीर्द गाजवली. त्यानंतर आता ब्रिटनच्या इतिहासात नवा अध्याय सुरू झाला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये काही नवे बदल होणार आहेत.

सात दशकांचा गौरवशाली प्रवास इतिहासजमा, कशी होती क्वीन एलिझाबेथ यांची कारकीर्द?

हे वाचलं का?

    follow whatsapp