किरण गोसावीची सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानागी

किरण गोसावीची सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानागी

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावी याची सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. किरण गोसावी हा फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी होता. त्याला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे फसवणूक प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील चिन्मय देशमुख या तरुणाच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी किरण गोसावीला (Kiran Gosavi) अटक करण्यात आल्यानंतर आता राज्यातील अनेक भागात आर्थिक फसवणुकीचे गुन्हा दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर 9 नोव्हेंबरला पुणे न्यायालयामध्ये किरण गोसावीला हजर केल्यावर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आता आज त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात (Aryan Khan Drug Case) प्राथमिक साक्षीदार असलेल्या किरण गोसावी हा आर्यन खान सोबतच्या एका सेल्फीमुळे चर्चेत आला होता. क्रूझवरील छाप्यानंतर गोसावीच आर्यनला खेचून NCB कार्यालयात गेला होता. पण त्यानंतर त्याचा एक सेल्फी समोर आला होता. याच सेल्फीमुळे तो स्वत:ही अडचणीत आला होता. पण यासोबतच या संपूर्ण प्रकरणाला देखील वेगळं वळण लागलं.

गोसावीच्या सेल्फीमुळे हे उघड झालं की, पुण्यातील एका प्रकरणात तो फरार होता. दरम्यान, आर्यनच्या ड्रग्स प्रकरणात केपी गोसावी हा चर्चेत आल्यानंतर पुणे पोलिसांकडून एका जुन्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. याच प्रकरणात आता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

क्रूज़ ड्रग पार्टी प्रकरणात Ncb चा साक्षीदार किरण गोसावीवर पुण्यात फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये 2018 मध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात झाला होता. तेव्हापासन तो फरार होता. त्याचा शोध पोलीस घेत होते.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात किरण गोसावी हा पंच होता. त्यादरम्यान त्याचा आर्यन खान सोबतचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. जेव्हा हा सेल्फी व्हायरल झाला तेव्हा आर्यन सोबतची ती व्यक्ती नेमकी कोण याचा शोध सुरू झाला असतानाच चिन्मय देशमुख याने पुणे पोलिसांकडे येऊन तक्रार केली की, आर्यनसोबत असलेल्या व्यक्ती हा किरण गोसावी असून आर्थिक फसवणूक प्रकरणा मधील फरार आरोपी आहे.

जेव्हा हे प्रकरण अधिक तापू लागलं तेव्हा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. अखेर 28 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कात्रज येथून त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्याविरोधात पुण्यासह राज्यात 9 ठिकाणी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. त्यापैकी सध्या फरासखाना प्रकरण सुरू आहे. तर पुण्यातील लष्कर आणि वानवडी प्रकरण बाकी आहे.

यामुळे किरण गोसावीच्या अडचणीत निश्चितच वाढ होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. दुसरीकडे आज न्यायालयामध्ये किरण गोसावीला हजर केल्यावर अधिक चौकशीसाठी त्याच्या पोलीस कोठडीमध्ये 3 दिवस वाढ करण्यात यावी, अशी मागणी कोर्टाकडे करण्यात आली होती. त्यावर दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यावर कोर्टाने त्याला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in