कोल्हापूर: शिवसैनिक काँग्रेसला मत देणार का?, CM उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
मुंबई: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गेले 15 दिवस सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज (10 एप्रिल) सायंकाळी 5 वाजता थंडावल्या. या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन सभा घेतली. याच सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, ‘शिवसैनिक काँग्रेसला मत देणारच.. दिलेला शब्द पाळणारच’ असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं […]
ADVERTISEMENT

मुंबई: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गेले 15 दिवस सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज (10 एप्रिल) सायंकाळी 5 वाजता थंडावल्या. या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन सभा घेतली. याच सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, ‘शिवसैनिक काँग्रेसला मत देणारच.. दिलेला शब्द पाळणारच’ असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असून आता ते काँग्रेसच्या नादी लागले आहेत अशी टीका त्यांच्यावर सातत्याने भाजप नेत्यांकडून सुरु असते. याच टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘शिवसैनिक हे काँग्रसेला मतदान करणारच.. कारण आम्ही दिलेला शब्द पाळतो’
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
‘2014 ला युती तोडताना काय म्हणून तुम्ही युती तोडली होती? आम्ही नव्हती युती तोडली. अगदी अर्ज भरायच्या एक दिवस आधी मला खडसेंचा फोन आला आणि मला म्हणाले की, ‘उद्धवजी आपलं काही जुळेल असं वाटत नाही आपण स्वतंत्र लढलेलं बरं.’ मी त्यादिवशी तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलो होतो. कारण आपल्या युतीच्या बोलण्यामध्ये एक समझोता होत आला होता. जागा वाटप होत आलं होतं. पण अचानक असं काय अक्रित घडलं होतं की, त्याही वेळेला आमच्या हातात भगवा होताच.. तेव्हा आम्ही तेच होतो जे आजही आहोत. पण युती तोडली आणि स्वतंत्र लढलात.’