कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : उद्धव ठाकरेंनी समजूत काढूनही शिवसैनिकांमध्ये नाराजी कायम

राजेश क्षीरसागरांची कबुली, परंतू मातोश्रीचा आदेश आमच्यासाठी अंतिम...नाराज कार्यकर्त्यांचं मन वळवू - क्षीरसागरांचा दावा
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : उद्धव ठाकरेंनी समजूत काढूनही शिवसैनिकांमध्ये नाराजी कायम

- दिपक सूर्यवंशी, कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसैनिकांचं संभाव्य बंड शमवण्यात पक्षाला यश आलं आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना पक्षाने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यायला सांगितल्यानंतर खुद्द क्षीरसागर यांच्यासह शिवसैनिकांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली. ज्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्री या निवासस्थानी क्षीरसागर यांना भेटायला बोलवून त्यांची समजूत काढली.

परंतू यानंतरही शिवसैनिकांमध्ये नाराजी कायम असल्याचं क्षीरसागर यांनी बोलून दाखवलं. आज महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा अर्ज दाखल करत असताना ते पत्रकारांशी बोलत होते.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : उद्धव ठाकरेंनी समजूत काढूनही शिवसैनिकांमध्ये नाराजी कायम
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : सतेज पाटील माणसं खाणारा माणूस - चंद्रकांत पाटलांची टीका

"शिवसैनिकांना मातोश्रीचा संदेश गेला आहे त्यामुळे आणखी वेगळा संदेश काय द्यायचा? मी या ठिकाणी तुम्हाला आणि महाविकास आघाडीच्या सर्वांना आश्वस्त करतो की आपल्या उमेदवाराचा विजय निश्चीत आहे. हळुहळु चंद्रकांत पाटील काय म्हणतायत याकडे कोणीही लक्ष देणार नाही. कारण ते जे काही म्हणत असतात ते होतही नाही. लोकांच्या आणि मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम हा एकमेव अजेंडा त्यांचा आहे. कोल्हापुरातली शिवसेना आणि शिवसैनिक हे भक्कम आहेत."

वर्षानूवर्ष बाळासाहेब आणि उद्धवजींना मानणारा शिवसैनिक इकडे आहे. थोडीफार नाराजी राहणार आहे कारण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मातोश्रीचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो. २६ तारखेला आम्ही शिवसेनेचा मेळावा घेतोय तिकडे आम्ही नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढू असं क्षीरसागर म्हणाले.

भाजप प्रमाणेच महाविकास आघाडीतर्फे आज जयश्री जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीकडून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे उपस्थित होते.

महाविकास आघाडीतील इतर नेत्यांच्या गळ्यात तिन्ही पक्षांचे मफलर दिसत होते.
महाविकास आघाडीतील इतर नेत्यांच्या गळ्यात तिन्ही पक्षांचे मफलर दिसत होते.
परंतू क्षीरसागर आणि सतेज पाटलांच्या अशा पद्धतीने उपस्थितीमुळे चर्चा रंगलीच...
परंतू क्षीरसागर आणि सतेज पाटलांच्या अशा पद्धतीने उपस्थितीमुळे चर्चा रंगलीच...

यावेळी महाविकास आघाडीमधल्या नेत्यांच्या गळ्यातल्या मफलरची चर्चा चांगलीच रंगली होती. जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या सर्व नेत्यांनी गळ्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मफलर घातले होते. परंतू राजेश क्षीरसागर यांनी गळ्यात फक्त शिवसेनेचाच मफलर घातला होता. दुसरीकडे सतेज पाटील आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज यांनी गळ्यात कोणतेच मफलर घातले नव्हते. त्यामुळे या पोटनिवडणुकीत दोन प्रमुख पक्षांमध्ये नाराजीनाट्य अद्यापही सुरु असल्याची चर्चा आज कोल्हापूरात पहायला मिळाली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in