अयोध्येसह 46 रेल्वे स्थानकं उडवण्याची ‘तोयबा’कडून धमकी; सुरक्षा व्यवस्था वाढवली
विधानसभा निवडणुकीमुळे देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशातून मोठी माहिती समोर आली आहे. अयोध्येसह उत्तर प्रदेशातील 46 रेल्वे स्थानकं उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली असून, या पार्श्वभूमीवर सर्व रेल्वे स्थानकांची सुरक्षा व्यवस्था वाढण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील रेल्वे विभागाला रेल्वे स्थानकं उडवून देण्याची धमकी देणारं पत्र मिळालं आहे. पत्रावर दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचा […]
ADVERTISEMENT

विधानसभा निवडणुकीमुळे देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशातून मोठी माहिती समोर आली आहे. अयोध्येसह उत्तर प्रदेशातील 46 रेल्वे स्थानकं उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली असून, या पार्श्वभूमीवर सर्व रेल्वे स्थानकांची सुरक्षा व्यवस्था वाढण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील रेल्वे विभागाला रेल्वे स्थानकं उडवून देण्याची धमकी देणारं पत्र मिळालं आहे. पत्रावर दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचा उल्लेख असून, उत्तर प्रदेशातील 46 रेल्वे स्थानकं उडवून देणार असल्याचं त्यात म्हटलं आहे. यात अयोध्या, लखनऊ, वाराणसी या रेल्वे स्थानकांचाही समावेश आहे.
धमकीचं पत्र मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातील सर्वच रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांच्या बरोबर पोलीस तैनात करण्यात आले असून, श्वान पथकंही तपासणी करण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी झाडाझडतीही घेतली जात असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.
याविषयी बोलताना रेल्वेचे अधिकारी म्हणाले, धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशाच धमक्या देण्यात आल्या होत्या. पण, प्रशासनाने पत्राची गंभीर दखल घेतली असून, सर्वच हालचालींवर नजर ठेवली जात आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.