राहुल भट्ट यांच्या हत्येचा बदला, लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरसह तीन आतंकवाद्यांना कंठस्नान

मुंबई तक

जम्मू-काश्मीरमधील बडगाममधील वॉटरहोल भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर लतीफ रादर याच्यासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. घटनास्थळावरून मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारणे हे मोठे यश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मारल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

जम्मू-काश्मीरमधील बडगाममधील वॉटरहोल भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर लतीफ रादर याच्यासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. घटनास्थळावरून मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारणे हे मोठे यश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या मे महिन्यात झालेल्या हत्येतही सामील होता, असे सांगण्यात येत आहे.

बडगाममध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश

काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी सांगितले की, बडगाममध्ये आज ज्या तीन लष्कर दहशतवाद्यांना ठार करण्यात आले त्यात लतीफ राथेर ऊर्फ ओसामाचा समावेश आहे. बुधवारी सकाळी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी जिल्ह्यातील खानसाहिब भागातील वॉटरहोल येथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली.

राहुल भट यांची कार्यालयात गोळ्या झाडून केली होती हत्या

12 मे रोजी जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चदूरा शहरात राहुल भट्ट यांची तहसील कार्यालयात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. निर्वासितांसाठी विशेष रोजगार पॅकेज अंतर्गत त्यांना कारकुनाची नोकरी मिळाली. त्यानंतर काही दिवसांनी लष्कराच्या दहशतवाद्यांनी टीव्ही कलाकार अमरीन भट यांची बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथे त्यांच्या घरी गोळ्या झाडून हत्या केली होती.

राहुल भट यांच्या हत्येचा तीव्र निषेध करण्यात आला होता

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हिंदू आणि मुस्लिम समुदायातील महत्त्वाच्या लोकांची ‘टार्गेट किलिंग यावर्षी मे महिन्यात सुरू झाली. राहुल भटच्या हत्येनंतर, पंतप्रधान पॅकेज-वर्ष 2012 अंतर्गत काम करणाऱ्या डझनभर काश्मिरी पंडितांनी निषेध केला होता. भट यांच्या हत्येनंतर सुमारे 6,000 काश्मीरी पंडित कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी निदर्शने केली होती. त्यांची घाटीबाहेर बदली करण्याची मागणी केली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp