Lockdown: दोन तासात लग्न आटपा नाहीतर 50 हजारांचा दंड, 22 तारखेपासून नवे निर्बंध

वाचा काय आहेत राज्य सरकारने लागू केलेले नवे निर्बंध
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेछायाचित्र-ट्विटर

कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यासाठी 22 एप्रिलपासून राज्यात नव्या गाईडलाईन्स लागू करण्यात आल्या आहेत. कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्यामुळे राज्यात आधीच निर्बंध लावण्यात आले आहेत. आता 22 एप्रिलपासून हे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. राज्यात आज दिवसभरातही 67 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळेच आता राज्य सरकारतर्फे आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये आता 15 टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती

मंत्रालयातले कर्मचारी आणि केंद्र सरकारचे कर्मचारी यांची मुंबईतील कार्यालयं, इतर भागांमधली कार्यालयं या सगळ्यांनी नियम पाळणं आवश्यक

खासगी कार्यालयांमध्ये फक्त 50 टक्के उपस्थिती अपेक्षित आहे, बाकीच्यांनी वर्क फ्रॉम होम करावं

कोरोना रुग्णसंख्या
कोरोना रुग्णसंख्या

लग्न समारंभ

लग्न समारंभासाठी आता हॉलमध्ये फक्त दोन तासांसाठी जास्तीत जास्त 25 लोकांना उपस्थित राहता येईल. जर एकाही कुटुंबाने लग्न समारंभाचा हा नियम मोडला तर त्यांच्याकडून 50 हजारांचा दंड वसूल केला जाईल. लग्न समारंभाला हजर राहतानाही कोव्हिड 19 प्रतिबंधाचे सगळे नियम पाळणं आवश्यक

वाहतूक विषय नियमांमध्ये बदल

खासगी प्रवाशांना फक्त तातडीच्या कारणासाठी किंवा अत्यावश्यक गरजेसाठी प्रवास करता येईल. बसमध्ये एकूण आसन क्षमतेच्या फक्त 50 टक्के प्रवाशांना मुभा.

प्रवाशाला त्याच्या मूळ गावी जायचं असेल तर त्यांना प्रवासाची मुभा आहे. मात्र अत्यावश्यक कारणासाठीच गावी जाता येईल. फिरण्यासाठी गावी जाण्याची किंवा इतर कुठे प्रवास करण्याची मुभा नाही

अंत्यविधी किंवा त्या कारणाइतकं तातडीचं कारण असेल तर प्रवास करण्याची मुभा आहे, आवश्यक सेवा किंवा तातडीचं कारण या शिवाय सर्व कारणांसाठी प्रवासावर निर्बंध आहेत जर या नियमांचं उल्लंघन केलं असेल तर 10 हजारांचा दंड घेतला जाईल

खासगी बसेसनाही त्यांच्या एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी नेण्याची मुभा देण्यात आली आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Maharashtra Lockdown: महाराष्ट्राची वाटचाल संपूर्ण लॉकडाऊनच्या दिशेने, अनेक जिल्ह्यात कठोर निर्बंध

सार्वजनिक प्रवासी वाहतूक

उपरोक्त कॅटेगरीतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनो या तिन्ही मार्गांनी प्रवासाची मुभा

सर्व सरकारी सेवेतील कर्मचारी(राज्य सरकार, केंद्र सरकार, स्थानिक सरकारी कर्मचारी). या सगळ्यांनाच तिकिट किंवा पास दिला जाईल. त्यासाठी सरकारी ओळखपत्र दाखवणं बंधनकारक असणार आहे.

वैद्यकीय सेवेत काम करणारे कर्मचारी, डॉक्टर्स, लॅब टेक्निशियन्स, हॉस्पिटल आणि मेडिलक क्लिनिक स्टाफ यांनाही आय कार्ड दाखवून तिकीट किंवा पास दिला जाईल त्यांनाच लोकल, मेट्रो किंवा मोनेने प्रवास करता येईल.

ज्या माणसाला वैद्यकीय उपचार घ्यायचे आहेत खास करून दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याला प्रवास करण्याची मुभा

बसमध्ये उभ्याने प्रवास करता येणार नाही, खासगी बसेस 50 टक्के क्षमतेने सुरू असतील

लोकल ट्रेन सामान्यांसाठी पूर्णतः बंद, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आय कार्ड सक्तीचं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सिनेमा आणि मालिकांना कोरोनाचा फटका; 15 दिवस शूटिंग राहणार बंद

शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये चालणाऱ्या खासगी बसेससाठी नियम

शहरांमध्ये प्रवास करायचा असेल तर दोन पेक्षा जास्त ठिकाणी बस थांबवू नये. या प्रवासाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देणं आवश्यक आहे

जे प्रवासी जिल्ह्यातून बाहेर जातील त्यांच्या ते त्यांच्या इच्छित स्थळी उतल्यानंतर त्यांच्या हातावर 14 दिवस क्वारंटाईन असा उल्लेख असलेला शिक्का मारावा. हे काम ज्या खासगी बसमधून ते प्रवास करत असतील त्या बसच्या ऑपरेटरने करायचे आहे.

बस प्रवासाच्या आधी प्रवाशाचं थर्मल स्कॅनिंग आवश्यक आहे, कुणालाही ताप आला असेल तर त्याला तातडीने कोव्हिड सेंटरमध्ये जाण्यास सांगायचं आहे

जिल्हाधिकारी हे RAT अर्थात रॅपिड अँटिजेन टेस्ट करू शकतात, या चाचणीचा खर्च ठरवल्याप्रमाणे बस ऑपरेटरने किंवा प्रवाशाने करावा

जर कुणीही या नियमांचं उल्लंघन केलं तर त्या व्यक्तीला 10 हजारांचा दंड ठोठावण्यात येईल. तसंच एकपेक्षा जास्त वेळा एखाद्या ऑपरेटरने नियम मोडला तर त्याचा परवाना रद्द करण्यात येईल

13 एप्रिलला जे नियम लागू करण्यात आले आहेत ते कायम असणारच आहेत. अशात आता निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. 1 मे 2021 च्या सकाळी 7 पर्यंत हे नियम लागू असणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in