Maharashtra Bandh: शरद पवारांच्या आग्रहामुळे शिवसेनेची फरफट, आजचा बंद फसला – चंद्रकांत पाटील

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील हत्याकांडाविरुद्ध राज्यात आज महाविकास आघाडीमधल्या पक्षांनी एक दिवसाच्या बंदची घोषणा केली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तिन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरुन दुकानदारांना आपली दुकानं बंद करायला भाग पाडलं. काही ठिकाणी तणावाचे प्रसंगही निर्माण झाले. परंतू विरोधी पक्षातील भाजपने या बंदवरुन शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला टोले लगावले आहेत.

आजचा बंद हा पूर्णपणे फसला असून शिवसेनेची या बंदमध्ये सहभागी व्हायची इच्छा नव्हती परंतू पवारांच्या आग्रहामुळे त्यांची फरफट झाली असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

Maharashtra Bandh: ‘जालियनवाला बाग तर पुण्यातील मावळमध्ये झालेलं’, फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शरद पवारांमुळे शिवसेनेची फरफट –

“राज्यात वादळ आणि महापुरानं झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचं टाळणाऱ्या राज्य सरकारनं दडपशाहीने केलेला आजचा बंद पूर्णपणे फसला आहे. ज्यांच्या हातात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, त्यांनीच हातात दंडुके घेऊन राज्य बंद करण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारनं केलेला बंद म्हणजे, ईडीच्या धडींपासून लक्ष विचलित करण्याचा आणि राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार आहे. दमध्ये सहभागी होण्याची शिवसेनेची इच्छा नव्हती, पण शरद पवारांच्या आग्रहामुळं शिवसेनेची फरफट होत आहे”, चंद्रकांत पाटील कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

ADVERTISEMENT

यावेळी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारने दडपशाहीचा वापर करुन दुकानं बंद ठेवायला व्यापाऱ्यांना भाग पाडलं असा आरोप केला आहे. लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेनंतर पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. त्याचा तपासही सुरू आहे. त्या घटनेनंतर उत्तर प्रदेशात बंद झाला नाही, पण महाराष्ट्रात राज्य सरकारनं केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी जबरदस्तीनं बंदचं आवाहन केलं. आजचा महाराष्ट्र बंद पूर्णपणे फसला आहे. राज्यात वादळं आणि महापुरानं प्रचंड नुकसान झालं. त्याची नुकसानभरपाई देण्याऐवजी लखीमपूरप्रकरणी महाराष्ट्र बंद करण्यात कसली संवेदनशीलता? असा सवाल आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थित केला.

ADVERTISEMENT

Maharashtra Bandh: मुंबईत ‘महाराष्ट्र बंद’ला गालबोट, 8 ठिकाणी फोडल्या BEST बस

आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी बंदच्या निमित्तानं राज्य सरकारवर जोरदार टीका केली. अतिवृष्टी आणि महापुरानं झालेल्या नुकसानीचे अजून पंचनामे पूर्ण झाले नाहीत. 2019 च्या जी.आर.नुसार मदत मिळावी, असा लोकांचा आग्रह आहे, पण सरकारकडून मदत मिळत नाही. शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी अर्धवट राहिली. प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी तर काहीच हालचाली नाहीत. निसर्गालाही हे सरकार मान्य नाही. हे सरकार आल्यापासून सतत नैसर्गिक आपत्ती येतात. शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी कर्ज काढू, असं म्हणणारे अजित पवार आतापर्यंत काय करत होते? असा सवाल आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थित केलाय.

मुळातच कोरोना, महापूर आणि अतिवृष्टीच्या संकटाला त्रासलेल्या व्यापाऱ्यांचा बंदला विरोध होता. दडपशाहीनं केलेल्या बंदमुळं लोकांमध्ये उद्रेक आहे. याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसतील, असा इशाराही आमदार पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT