Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ‘मैं झुकेगा नहीं…’ म्हणणाऱ्या आजींच्या घरी
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी हनुमान चालीसा पठणाचं आव्हान दिल्यानंतर मातोश्री बाहेर तळ ठोकून बसणाऱ्या ८० वर्षीय शिवसैनिक आजींची मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब भेट घेणार आहेत. चंद्रभागाबाई शिंदे यांच्या घरी उद्धव ठाकरे जाणार आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, बडनेराचे आमदार रवि राणा यांनी हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून उद्धव […]
ADVERTISEMENT

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी हनुमान चालीसा पठणाचं आव्हान दिल्यानंतर मातोश्री बाहेर तळ ठोकून बसणाऱ्या ८० वर्षीय शिवसैनिक आजींची मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब भेट घेणार आहेत. चंद्रभागाबाई शिंदे यांच्या घरी उद्धव ठाकरे जाणार आहेत.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, बडनेराचे आमदार रवि राणा यांनी हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. मातोश्री बाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.
Shiv Sena: ‘येऊ दे राणा, मैं झुकेंगा नही…’, 80 वर्षांच्या आजीने ‘मातोश्री’समोर ठोकला तळ
नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या आव्हानानंतर मुंबईत शिवसैनिक आक्रमक झाले होते. २२ एप्रिलपासूनच शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या हालचालीवरून लक्ष ठेवून असल्याचं दिसलं. मात्र, नवनीत राणा, रवि राणा यांनी मुंबईत पाऊल ठेवलं आणि तणाव वाढला होता.
राणा दाम्पत्य २३ एप्रिलला मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार होते. त्यामुळे शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी चंद्रभागाबाई शिंदे या ८० वर्षीय शिवसैनिक आजीही मागे राहिल्या नाही. मातोश्रीबाहेर बसलेल्या या आजींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनही केला होता.
मातोश्री बाहेरच्या 80 वर्षांच्या आजींची पुष्पा स्टाईल मुलाखत
त्यानंतर आज मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह चंद्रभागाबाई शिंदे यांची भेट घेणार आहेत.