महाराष्ट्र सावध! दक्षिण आफ्रिकेसह ‘या’ देशांतून येणाऱ्यांना क्वारंटाईन, कोविड चाचणी सक्तीची

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभर चिंतेचं सावट पसरलं आहे. अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतील देशांसाठी स्वतःची दारं बंद केली आहेत. भारतात हा निर्णय झाला नसला, तरी राज्य सरकारने मात्र, सावध भूमिका घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने दक्षिण आफ्रिकेसह जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या नागरिकांसाठी क्वारंटाईनसह काही गोष्टी सक्तीच्या केल्या आहेत. (Maharashtra guidelines for international travellers)

ओमिक्रॉन व्हेरिएंट सर्व प्रथम आढळून आलेल्या दक्षिण आफ्रिकेतील राष्ट्रासह ज्या ठिकाणी या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. त्या राष्ट्रांना जोखमीच्या देशांच्या यादीत (countries at risk) टाकण्यात आलं आहे. या देशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारने मार्गदर्शन नियमावली जाहीर केली आहे. प्रवाशांसाठी या गोष्टी सक्तीच्या असणार आहेत.

Omicron Variant : आफ्रिकेसह इतर देशातून महाराष्ट्रात आलेले 6 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जोखमीच्या (at risk) यादीत कोणते देश?

ओमिक्रॉन व्हेरिएंट सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आला. मात्र, त्यानंतर इतरही काही देशात हा व्हेरिएंट पोहोचला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अशा देशांची यादी तयार केली आहे. यात युरोपातील देश, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिब्बाबे, सिंगापूर, हाँगकाँ आणि इस्रायल या देशांचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

प्रवाशांसाठी काय आहे नियमावली?

ADVERTISEMENT

केंद्र सरकारने जोखमीच्या यादीत टाकलेल्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन सक्तीचं करण्यात आलं आहे. या प्रवाशांना आल्यानंतर लगेच कोविड चाचणी करणं सक्तीचं करण्यात आलं आहे. त्याचबरोबर सात दिवस संस्थात्मक विलगीकरणात (institutional quarantine) राहावं लागणार आहे.

क्वारंटाईन झाल्यानंतर या प्रवाशांची दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी कोविड चाचणी (RT-PCR) केली जाणार आहे. जर कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली, तर या व्यक्तीला रुग्णालयात भरती केलं जाणार आहे. कोविड चाचणी निगेटिव्ह आली, तरीही प्रवाशाला नंतर सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे.

मुंबई विमानतळावर प्रशासनानं यासाठी व्यवस्था तयार केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीप्रमाणे विमानतळावर 48 रजिस्ट्रेशन काऊंटर सुरू करण्यात आले आहेत, तर स्वॅब घेण्यासाठी 40 बूथ सुरू करण्यात आली आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT