कायदा हातात घेऊ नका, संघर्ष वाढवू नका! दिलीप वळसे पाटील यांचा राज ठाकरेंना इशारा
कुणीही कायदा हातात घेऊ नये, संघर्ष वाढवू नये अन्यथा आम्ही कठोर कारवाई करू असं महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. सध्या राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणली जाते आहे असेच आणखी काही प्रयत्न झाले तर आम्हाला कठोर कारवाई करावी लागेल असंही वळसे पाटील यांनी सांगितलं. माझ्यासाठी भोंगे […]
ADVERTISEMENT

कुणीही कायदा हातात घेऊ नये, संघर्ष वाढवू नये अन्यथा आम्ही कठोर कारवाई करू असं महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. सध्या राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणली जाते आहे असेच आणखी काही प्रयत्न झाले तर आम्हाला कठोर कारवाई करावी लागेल असंही वळसे पाटील यांनी सांगितलं.
माझ्यासाठी भोंगे नाही तर महागाई आणि सामान्यांना भेडसावणारे प्रश्न महत्त्वाचे-सुप्रिया सुळे
काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?
पोलीस महासंचालकांनी मंगळवारी विविध पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन राज्यातल्या स्थितीचा आढावा घेतला. आगामी काळात कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी काम करावं लागेल. त्यासंदर्भातला प्लान त्यांनी माझ्यासमोर आज मांडला आहे.