बंडखोरांची पहिली पसंती ‘भाजप’; फुटीचा जास्त फटका काँग्रेसला, काय सांगतो ADIचा रिपोर्ट?
आधी कर्नाटक, नंतर मध्य प्रदेश आणि आता महाराष्ट्र. आमदारांच्या बंडखोरीचा खेळ महाराष्ट्रातही सुरू झाला आहे. शिवसेनेचे आमदार आणि उद्धव सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाची तलवार उपसली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. जे कर्नाटक आणि मध्य प्रदेशात झाले तेच महाराष्ट्रात झाले तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचेही सरकारही […]
ADVERTISEMENT

आधी कर्नाटक, नंतर मध्य प्रदेश आणि आता महाराष्ट्र. आमदारांच्या बंडखोरीचा खेळ महाराष्ट्रातही सुरू झाला आहे. शिवसेनेचे आमदार आणि उद्धव सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाची तलवार उपसली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. जे कर्नाटक आणि मध्य प्रदेशात झाले तेच महाराष्ट्रात झाले तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचेही सरकारही पडेल.
महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. एका आमदाराच्या निधनामुळे एक जागा रिक्त झाली आहे, त्यामुळे आता 287 आमदार आहेत. सरकार बनवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी 144 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारकडे 153 आमदार आहेत. यामध्ये शिवसेनेचे 55, राष्ट्रवादीचे 53 आणि काँग्रेसचे 44 उमेदवार आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हे आपल्यासोबत 40 हून अधिक आमदार असल्याचा दावा करत आहेत. या बंडखोर आमदारांनी भाजपची कास धरल्यास महाराष्ट्रात पुन्हा भाजपचेच सरकार स्थापन होईल हे जवळपास निश्चित आहे.
बंडखोर आमदारांची पहिली पसंती भाजप राहिली आहे. 5 वर्षात 405 आमदारांनी पक्ष सोडल्याची आकडेवारी सांगते. यापैकी 45 टक्के आमदारांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ही आकडेवारी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ची आहे. यामध्ये 2016 ते 2020 या पाच वर्षात पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात दाखल झालेल्या आमदारांचे विश्लेषण करण्यात आले आहे. हा एडीआर अहवाल गेल्या वर्षी मार्चमध्ये समोर आला होता.
बंडखोरीचा सर्वाधिक फायदा भाजपला