महाराष्ट्रात दिवसभरात 3105 नवे कोरोना रूग्ण, 50 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 3105 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 50 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात 3164 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 74 हजार 892 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.27 टक्के […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात दिवसभरात 3105 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 50 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात 3164 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 74 हजार 892 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.27 टक्के झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 89 लाख 10 हजार 564 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 53 हजार 961 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 41 हजार 110 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1355 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात आज घडीला 36 हजार 371 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 3105 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 53 हजार 961 इतकी झाली आहे.