सांगलीतील रँचो! दुचाकी इंजिनचा वापर करत बनवली चारचाकी; शेतीसाठी ठरणार फायदेशीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्वाती चिखलीकर, सांगली

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील कुमार पाटील या तरुणाने फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर चारचाकी गाडी तयार करण्याची किमया केली आहे. दुचाकीच्या इंजिनचा वापर तयार करण्यात आलेली ही चारचाकी गाडी शेतकऱ्यांना वरदान ठरणार शकते. शेतीमध्ये अंतर्गत मशागतीची कामे या गाडीने सहज करता येतात. वर्षभराच्या मेहनतीने तयार करण्यात आलेल्या गाडीची अंतिम चाचणीही यशस्वी झाली आहे.

इस्लामपूर-पेठ रस्त्यावर विष्णूनगर येथे पाटील यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. गेली वीस वर्षे ते व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना छोटी-छोटी सायकल कोळपी व इतर लोखंडी अवजारे बनवून देतात. हे करत असतानाच शेतकऱ्यांना उपयुक्त असे नवीन काही करता येईल का? असा विचार त्यांच्या मनात आला आणि अशा पद्धतीची गाडी तयार करण्याच्या कल्पनेची ठिणगी पडली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वर्षभरापूर्वी त्यांना चार चाकी गाडीची कल्पना सुचली. लोखंडी साहित्य वापरताना दुचाकीचे इंजिन वापरण्याचं त्यांनी ठरवलं. 100 सीसी इंजिन घेत त्यापासून चारचाकीची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. घरामध्ये सर्वांचा विरोध असताना दोन वेळा तयार झालेल्या चारचाकी गाडीचा सांगाडा मोडीत काढला.

ADVERTISEMENT

पाटील यांनी नवनिर्मितीचा ध्यास घेत पुन्हा ही गाडी तयार केली. गाडी तयार करीत असताना स्टेरिंग ऐवजी हॅण्डलचा वापर केला. गिअर टाकून गाडी पाठीमागे सहज घेता येईल का? यासाठी प्रयत्न केले आणि त्याला यशही आले आहे. इंजिन दुचाकीचे असले तरी रिव्हर्स गियरचा बॉक्स स्वतःच्या कल्पकतेनं त्यांनी तयार केला. तयार गाडीला शेती अवजारे कशी जोडता येतील? यासाठी मित्रांशी चर्चा करून तशी अवजारे ही बनवलेली आहेत.

ADVERTISEMENT

कोळपणी, नांगरट, पेरणी तसेच औषध फवारणी या शेती कामासाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे. कमीत कमी जागेत सहजपणे गाडी नेता येते. पशुखाद्याच्या पोत्यांची वाहतूक तसेच वैरणीचीने आण करण्यासाठी सीटच्या मागे दोन्ही चाकांच्या गार्डवर तशी रचना केली आहे.

पाटील यांनी विष्णूनगरमध्ये एका शेतकऱ्याच्या शेतीमध्ये गाडीची चाचणी घेतली. 1 लिटर पेट्रोलमध्‍ये १ एकर क्षेत्रातील कोळपणीचे काम ही चारचाकी गाडी करते. अल्प वेळेत व कमी खर्चात चारचाकी गाडी काम करत असल्याने शेतकऱ्यांना ती भविष्यात वरदान ठरेल असं बोललं जात आहे.

सांगली जिल्ह्यात अनेक जण हौस म्हणून चारचाकी गाडी बनवत आहेत. कुमार पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी बनवलेली गाडी मात्र कौतुकाचा विषय ठरत आहे. एक वर्षाची मेहनत व सुमारे 60 हजार रुपये खर्चून ही गाडी बनवण्यात आली आहे.

नुकतेच देवराष्ट्रे येथील फॅब्रिकेशन व्यवसाय करणारे दत्तात्रय लोहार यांनी देखील अशाच पद्धतीची भंगारातील साहित्य आणि दुचाकीचे इंजन वापरून जुगाड जिप्सी तयार केली आहे. याची दखल अगदी आनंद महिंद्रा यांनी देखील घेतली होती. त्यामुळे ही गाडी सध्या चर्चेचा विषय बनली होती.

त्याचबरोबर सांगली येथील एका सातवीपर्यंतच शिक्षण घेतलेल्या अशोक आवटी या मॅकॅनिकने अवघ्या 30 हजार रूपयांत फोर्ड कार 1930 ची प्रतिकृती बनवली आहे. ती एम-८० पासून जुगाड गाडी बनवली आहे. कल्पनांना प्रत्यक्षात साकारणाऱ्या रँचोंच्या यादीत आता इस्लामपूरच्या कुमार पाटील यांचाही समावेश झाला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT