सोशल मीडिया यूजर्सना सध्या रील तयार करण्याचे वेड लागले आहे.
नोएडातील मेट्रोत एक असा प्रकार घडला आहे जो, पाहून प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
एक मुलगी रिल बनवण्यासाठी नोएडा मेट्रोमध्ये घुसून लोकांना घाबरवताना दिसत आहे.
सोशल मीडियावर या मुलीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
रीलमध्ये ही मुलगी भूलभुलैया चित्रपटातील मंजुलिकाच्या लूकमध्ये दिसत आहे.
विस्कटलेले केस, भयानक मेकअप, कपाळावर कुंकवाचा टीळा असा मेकओव्हर तिने केला आहे.
मंजुलिकाच्या वेशात असलेल्या या मुलीने भयानक आवाज काढत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना घाबरवलं आहे.