Maratha Reservation : टाईमपास आणि थापा मारणं बंद करा; छत्रपती उदयनराजे ठाकरे सरकारवर भडकले
राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केला होता. त्यानंतर केंद्राने १२७वी घटनादुरुस्ती करून हा अधिकार राज्यांना बहाल केला आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हा कायदा अस्तित्वात येणार असून, छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ठाकरे सरकारला खडेबोल सुनावले आहेत. टाईमपास बंद करा, म्हणत उदयनराजेंनी संताप व्यक्त केला. उदयनराजे भोसले […]
ADVERTISEMENT

राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केला होता. त्यानंतर केंद्राने १२७वी घटनादुरुस्ती करून हा अधिकार राज्यांना बहाल केला आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हा कायदा अस्तित्वात येणार असून, छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ठाकरे सरकारला खडेबोल सुनावले आहेत. टाईमपास बंद करा, म्हणत उदयनराजेंनी संताप व्यक्त केला.
उदयनराजे भोसले काय म्हणाले?
‘मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने १०२व्या घटना दुरुस्तीचा दाखला देत राज्य सरकारला एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार नाही, असा निकाल दिला होता. त्यामुळे गेली तीन महिने राज्य सरकार आरक्षणाची जबाबदारी केंद्र शासनावर ढकलून देत ‘टाईमपास’ करत होते का? मात्र आता केंद्राने १२७वी घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करून राज्याला पुन्हा अधिकार बहाल केले आहेत. त्यासंबधीचा कायदा राष्ट्रपतींकडे मंजूरीसाठी पाठविला असून लवकरच त्याला मंजूरी मिळून कायदा अस्तित्वात येईल’, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
‘या घटनादुरूस्तीमुळे राज्य सरकारला एखाद्या समाजाला सामाजिक न शैक्षणिक मागास ठरवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता थापा मारणे बंद करून मराठा समाजाला भूलथाप देणे बंद करावे. तसेच केंद्राकडे बोट न दाखवता मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रत्यक्ष कृती सुरू करावी. राज्य सरकारने मराठी आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याची सवय आता बंद करावी’, असंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.