वीर सावरकरांना मराठी माणूस कधीही विरोध करूच शकत नाही, जो वाद झाला तो दुर्दैवी-शरद पवार
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं एक आगळवेगळं व्यक्तिमत्व होतं. मला एका गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की या वेळचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे जयंत नारळीकर आहेत. विज्ञानवादाचा पुरस्कार त्यांनी या साहित्य संमेलनात केला. माझ्या वाचनात जे जुने साहित्यिक आहेत आणि त्यांचं लिखाण ज्यावेळी मी आठवतो त्यावेळी मला सावरकर आठवतात. वीर सावरकर हे विज्ञानवादी होते, ते नाही त्या […]
ADVERTISEMENT

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं एक आगळवेगळं व्यक्तिमत्व होतं. मला एका गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की या वेळचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे जयंत नारळीकर आहेत. विज्ञानवादाचा पुरस्कार त्यांनी या साहित्य संमेलनात केला. माझ्या वाचनात जे जुने साहित्यिक आहेत आणि त्यांचं लिखाण ज्यावेळी मी आठवतो त्यावेळी मला सावरकर आठवतात. वीर सावरकर हे विज्ञानवादी होते, ते नाही त्या गोष्टींचा पुरस्कार कधीही करत नव्हते. असं आज शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांचं योगदान आपण कधीही विसरू शकत नाही असंही ते म्हणाले आहेत. तसंच त्यांच्या नावावरून जो वाद झाला तो दुर्दैवी आहे असंही वक्तव्य शरद पवारांनी केलं. त्यांना विरोध असण्याचं काही कारणच नाही असंही ते म्हणाले.
गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक, शरद पवार म्हणतात ही बाब निंदनीय
साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या भाषणात काय म्हणाले शरद पवार?
वीर सावरकर यांनी भगूरला जन्म घेतला. त्यांनी सुरू केलेल्या क्रांती यज्ञात अनेक क्रांतीकारक सहभागी झाले. याच नाशिकच्या भूमीत अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा जुलमी कलेक्टर असलेल्या जॅक्सनला 1909 मध्ये गोळ्या घालून ठार केलं. इंग्रज सरकारला कानठळ्या बसवणाऱा पराक्रम ज्या नाशिकच्या भूमित घडला त्याच भूमित हे साहित्य संमेलन होतंय याचा विशेष आनंद होतो आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. साहित्य संमेलनाचा आज अखेरचा दिवस होता, त्यावेळी शरद पवार यांनी आपले विचार मांडले आहेत.