नारायण राणेंनी वेळोवेळी गद्दारी केलीये, त्यांना…; आमदार वैभव नाईकांचं टीकास्त्र
–भरत केसरकर, सिंधुदुर्ग सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार दिपक केसरकर यांच्यावर टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर आमदार वैभव नाईक यांनी निशाणा साधला आहे. “स्वतःच्या कार्यकत्यांबरोबर गद्दारी करून राणेंनी ईडीची कारवाई टाळण्यासाठी व सत्तेसाठी भाजपमध्ये प्रवेश केला”, असं टीकास्त्र शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर डागलं आहे. आमदार वैभव नाईक यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून […]
ADVERTISEMENT

–भरत केसरकर, सिंधुदुर्ग
सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार दिपक केसरकर यांच्यावर टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर आमदार वैभव नाईक यांनी निशाणा साधला आहे. “स्वतःच्या कार्यकत्यांबरोबर गद्दारी करून राणेंनी ईडीची कारवाई टाळण्यासाठी व सत्तेसाठी भाजपमध्ये प्रवेश केला”, असं टीकास्त्र शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर डागलं आहे.
आमदार वैभव नाईक यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेळावे घेऊन भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना धमकावत आहेत. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडणुकांमध्ये गद्दारी केल्यास सोडणार नाही; बघून घेईन, अशा भाषेत त्यांना धमकी देत आहेत. मात्र नारायण राणेंनीच वेळोवेळी गद्दारी केली असल्याने गद्दारी या विषयावर कार्यकर्त्यांना धमकावण्याचा राणेंना नैतिक अधिकार नाही”, असा टोला नाईक यांनी राणेंना लगावला आहे.
शेंबडा आमदार म्हणत नारायण राणेंची टीका; केसरकरांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…