राज ठाकरे झाले आजोबा, शिवतिर्थावर नव्या पाहुण्याचं आगमन!

मुंबई तक

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता आजोबा झाले आहेत. कारण राज ठाकरे यांच्या सूनबाई आणि अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांना आज (5 एप्रिल) एका चिमुकल्याला जन्म दिला आहे.आज दुपारी राज ठाकरे यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजे शिवतिर्थावर आनंदाचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिताली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता आजोबा झाले आहेत. कारण राज ठाकरे यांच्या सूनबाई आणि अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांना आज (5 एप्रिल) एका चिमुकल्याला जन्म दिला आहे.आज दुपारी राज ठाकरे यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजे शिवतिर्थावर आनंदाचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिताली ठाकरे आणि बाळ सुखरूप असल्याचं समजतं आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनाने संपूर्ण ठाकरे कुटुंबीय सध्या खूपच आनंदात आहे. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे हे 27 जानेवारी 2019 रोजी ते विवाहबंधनात अडकले होते.

काही महिन्यापूर्वीच राज ठाकरे हे ‘कृष्णकुंज’हून बाजूलाच बांधलेल्या शिवतिर्थावर राहण्यासाठी गेले होते. त्याच शिवतीर्थावर आता चिमुकल्याचं आगमन झालं आहे.

मिताली ही एक फॅशन डिझायनर आहे. तिने फेड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझाइनिंगचं शिक्षण घेतलं आहे. तर मितालीचे वडील हे प्रख्यात डॉक्टर आहेत. राज ठाकरे यांची कन्या उर्वशी आणि मिताली या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. काही वर्षांपूर्वी दोघींनी ‘द रॅक’ नावाने एक कपड्यांचा ब्रँडही लाँच केला होता.

अमित आणि मिताली हे एकमेकांना मागील अनेक वर्षांपासून ओळखत होते. हळूहळू त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि अखेर 27 जानेवारी 2019 रोजी दोघेही लग्न बंधनात अडकले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच म्हणजे मराठी भाषा दिनी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे यांची निवड करण्यात आली होती.

मनसे नेते अमित राज ठाकरे लोकलने जाणार डोंबिवलीत; दोन दिवस कल्याण-डोंबिवलीत

मनसेच्या सुरुवातीच्या दिवसांपासून अनेक तरुणांचा या पक्षाकडे ओढा होता. राज ठाकरेंच्या भाषणशैली आणि विचारांनी प्रभावित होऊन अनेक कॉलेजचे विद्यार्थी मनसेत दाखल झाले होते. सुरुवातीला मनविसेची जबाबदारी आदित्य शिरोडकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. परंतू त्यांनी पक्षाला रामराम करुन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी मनसेचे विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद अमित यांच्याकडे सोपवलं आहे.

सक्रीय राजकारणात अमित यांची ही पहिलीच पायरी मानली जात असली तरीही काही महिन्यांपासून ते पक्षाच्या कामात सहभागी होते. विद्यार्थी, कोरोना काळात डॉक्टर, शिक्षकांच्या अनेक समस्यांविषयी त्यांनी सरकारला पत्र लिहीलं होतं. याचसोबत अमित ठाकरे हे नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांसाठी अमित ठाकरेंच्या माध्यमातून तरुण कार्यकर्त्यांना आशेचा किरण देण्याचा प्रयत्न या घोषणेतून मनसेने केल्याचं दिसतंय.

हे वाचलं का?

    follow whatsapp