मनसेकडून शिवसेना भवनासमोर हनुमान चालीसा पठण, यशवंत किल्लेदारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
राज ठाकरेंनी त्यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणात मशिदीवरचे भोंगे बंद करा अन्यथा आम्हाला हनुमान चालीसा पठण करावं लागेल असा इशारा दिला होता. त्यानंतर ठिकठिकाणी हनुमान चालीसा पठण झालंही होतं. आज रामनवमीच्या मुहूर्तावर मनसेने दादरच्या शिवसेना भवनासमोर हनुमान चालीसा पठण आणि धार्मिक गाणी सुरू केली. त्यानंतर पोलीस तिथे तातडीने पोहचले. त्यांनी गाणी वाजवणारी गाडी जप्त केली आहे. त्याचप्रमाणे […]
ADVERTISEMENT

राज ठाकरेंनी त्यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणात मशिदीवरचे भोंगे बंद करा अन्यथा आम्हाला हनुमान चालीसा पठण करावं लागेल असा इशारा दिला होता. त्यानंतर ठिकठिकाणी हनुमान चालीसा पठण झालंही होतं. आज रामनवमीच्या मुहूर्तावर मनसेने दादरच्या शिवसेना भवनासमोर हनुमान चालीसा पठण आणि धार्मिक गाणी सुरू केली. त्यानंतर पोलीस तिथे तातडीने पोहचले. त्यांनी गाणी वाजवणारी गाडी जप्त केली आहे. त्याचप्रमाणे मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनाही ताब्यात घेतलं आहे.
मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच ज्या कारवर लाऊड स्पीकर होते आणि गाणी वाजवली जात होती ती कारही पोलिसांनी जप्त केली आहे. मशिदींवरच्या भोंग्यावर बंदी आणा अन्य़था आम्हाला हनुमान चालीसा सुरू करावी लागेल असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यानंतर ठिकठिकाणी हनुमान चालीसा पठण करण्यात आलं होतं. आज थेट दादरच्या शिवसेना भवनासमोरच हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. तसंच धार्मिक गाणीही वाजवण्यात आली. त्यानंतर यशवंत किल्लेदार यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
काय म्हणाले यशवंत किल्लेदार?
रामनवमीचा सण आहे, तो सण साजरा करण्याच्या उद्देशानेच आम्ही हनुमान चालीसा पठण आणि गाणी वाजवली होती. मात्र आता आम्हाला तो सणही साजरा करायला देत नाहीत. पोलीस मला घेऊन शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जात आहेत ठीक आहे. मात्र पोलीस काय कारवाई करतात ते मी पाहतो. ही लोकशाही आहे का? महाराष्ट्रात हेच रामराज्य म्हणायचं का? हा आमचा प्रश्न आहे. अशा पद्धतीने जी कारवाई करण्यात आली आहे त्याचा आम्ही निषेध करतो असंही यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं आहे.