राज ठाकरेंच्या सभेला माणसं आणावी लागत नाहीत! संमती मिळाल्यावर काय म्हणाले बाळा नांदगावकर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला औरंगबाद पोलिसांनी सशर्त संमती दिली आहे. यानंतर मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे अशी ओळख असलेले बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राज ठाकरेंच्या सभेला माणसं आणावी लागत नाहीत गर्दी होतेच असं त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे सिक्युरिटी वाद कधीपासून आहे सुरू, किती वेळा बदलली सुरक्षा?

काय म्हणाले बाळा नांदगावकर?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलिसांनी संमती दिली आहे, चांगली गोष्ट आहे. त्यांनी ज्या अटी घातल्या आहेत तो त्यांचा फॉरमॅट आहे. आवाजाच्या मर्यादेचीही अट त्यांनी घातली आहे. त्याचंही आम्ही पालन करू पण लोक म्हटले तर त्यावेळी आम्ही काय करायचं पाहू. आम्हाला दोन दिवस आधी संमती मिळाली आहे. त्यामुळे मला वाटत नाही काही अडचणी येतील. राज ठाकरेंना यासंदर्भात कळवलं आहे असंही बाळा नांदगावकरांनी सांगितलं.

एवढंच नाही तर ते पुढे म्हणाले की, “शरद पवार, नितीन गडकरी यांच्या सभेला तातडीने संमती मिळाली. राज ठाकरेंच्या सभेला तातडीने संमती मिळाली नाही. राज ठाकरेंच्या सभेला माणसं आणावी लागत नाहीत. गर्दी फार होत असते. पक्षाचे कार्यकर्ते आणि अनेक लोक उत्स्फूर्तपणे येतात. गर्दी होते म्हणून पोलीस सतर्क असतात. आज ज्या अटी आम्हाला घालून दिल्या आहेत त्यापैकी जाचक असं काही वाटत नाही. भाषणात काय काय मुद्दे येतील ते आज माहित नाही. उद्या सकाळी औरंगाबाद पोलीस आयुक्तांसोबत आणखी एक बैठक करणार आहोत” असंही बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

१ मे रोजी औरंगाबादला राज ठाकरे यांची सभा होणार आहे. सुमारे १६ अटी घालत पोलिसांनी या सभेला सशर्त संमती दिली आहे. त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बाळा नांदगावकर हे औरंगाबादमध्ये तळ ठोकून आहेत. सभेला परवानगी आम्हाला मिळणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. आता आज ज्या अटी शर्थी घालून दिल्या आहेत, त्यामध्ये आवाजाचीही मर्यादा घालून दिली आहे. तसंच चिथावणी दिली जाईल असं भाषण करण्यासही मज्जाव केला आहे. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा मनसेची पोलीस आयुक्तांसोबत बैठक होणार आहे. त्यामध्ये काय होणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT