महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजारांहून जास्त नवे Corona रूग्ण, 159 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजार 108 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर दिवसभरात 159 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज महाराष्ट्रात 4 हजार 736 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 62 लाख 52 हजार 150 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.04 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 30 लाख 48 हजार 70 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 42 हजार 788 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 93 हजार 147 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 2334 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 50 हजार 393 सक्रिय रूग्ण आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

25 ऑगस्ट: राज्यात 5 हजार 31 नवे कोरोनाबाधित आढळले होते. 4 हजार 380 रूग्ण करोनातून बरे झाले होते. तर 216 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला होता.

24 ऑगस्ट: राज्यात 4 हजार 355 नवीन कोरोनाबाधित आढळले होते. 4 हजार 240 रूग्ण करोनातून बरे झाले होते. तर 199 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली होती.

ADVERTISEMENT

23 ऑगस्ट: राज्यात 6 हजार 795 रूग्ण कोरोनातून बरे झाले होते. तर 3 हजार 643 नवीन करोनाबाधित आढळून आले होते. तर, 105 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला होता.

ADVERTISEMENT

22 ऑगस्ट: राज्यात 4 हजार 141 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. तर 145 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 4 हजार 780 कोरोना रुग्णांनी करोनावर मात केली होती.

21 ऑगस्ट: राज्यात दिवसभरात 145 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली होती. तर, 4 हजार 575 नवीन कोरोनाबाधित आढळून आले होते. याचबरोबर 5 हजार 914 रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले होते.

सगळ्या संख्या पाहिल्या तर लक्षात येतं की मागील दोन दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 10 हजार 139 ने वाढली आहे. दरम्यान आज मुंबईत 397 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 507 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. तर मुंबईत आज घडीला 2736 रूग्ण सक्रिय आहेत.

पुण्यात 282 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 122 रूग्णांना दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आज दिवसभरात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात आज घडीला 2 हजार 222 सक्रिय रूग्ण आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT