Akola: मुलीला जन्म दिला अन् आईने हॉस्पिटलमध्येच घेतला फास, कारण... - Mumbai Tak - mothers suicide at akola district general hospital - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

Akola: मुलीला जन्म दिला अन् आईने हॉस्पिटलमध्येच घेतला फास, कारण…

Akola Crime news : अकोला : येथून अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना समोर येत आहे. अकोला (Akola) जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात एका नवमातेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोदावरी खिल्लारे (वय-25) असं या मृत नवमातेचे नाव आहे. अवघ्या 15 दिवसांपूर्वीच गोदावरीने मुलीला जन्म दिला होता. पण मागील 3 दिवसांपासून ती बेपत्ता होती. अखेरीस आज (शुक्रवारी) […]
Updated At: Mar 24, 2023 01:39 AM

Akola Crime news :

अकोला : येथून अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना समोर येत आहे. अकोला (Akola) जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात एका नवमातेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोदावरी खिल्लारे (वय-25) असं या मृत नवमातेचे नाव आहे. अवघ्या 15 दिवसांपूर्वीच गोदावरीने मुलीला जन्म दिला होता. पण मागील 3 दिवसांपासून ती बेपत्ता होती. अखेरीस आज (शुक्रवारी) सकाळी वार्ड क्रमांक 23 च्या शौचालयात तिचा मृतदेह आढळून आला. (Mother’s suicide at Akola district general hospital)

याबाबत डीन डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिमच्या गोदावरी खिल्लारे हिला काही दिवसांपूर्वी बाळंतपणासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 3 मार्चला तिने एका मुलीला जन्म दिला. दरम्यान, जन्मानंतर काही कारणांमुळे मुलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आईला डिस्चार्ज देऊनही अॅडमिट करुन ठेवलं होतं. मात्र 15 मार्चपासून ती अचानक गायब झाली.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 मार्च रोजी मृत गोदावरी यांच्या सासूने सून हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पण त्यांचा शोध लागू शकला नव्हता. दरम्यान, सफाई कर्मचांऱ्याचा संप सुरू असल्याने 3 दिवसांपासून शौचालयात कोणीही गेलं नव्हतं. आज साफसफाई करायला गेले असता वार्ड क्रमांक 23 च्या शौचालयातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर बघितले असता गोदावरी यांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं.

Crime: पत्नीचा एक टोमणा, पतीने कुऱ्हाडीने केले तुकडे, बाळालाही संपवलं

मुलगी झाल्याने मानसिक छळ?

दरम्यान, मागील 15 दिवसांपासून गोदावरी यांच्या सासर आणि माहेरची मंडळी रुग्णालयातच उपस्थित होते. मात्र आता मुलीच्या जन्मानंतर गोदावरी यांचा सासरच्या मंडळीकडून मानसिक छळ झाल्याचा आणि यातूनच आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. याबाबत नेमकं कारण समोर आलं नसलं तरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat! दिया मिर्झा ‘या’ एका गोष्टीने करते दिवसाची सुरूवात, जाणून घ्या Fitness रूटीन!