मुकेश अंबानींची मोठी घोषणा; दिवाळीच्या आधी या शहरात सुरु होणार 5G सर्व्हिस

मुंबई तक

Reliance AGM 2022: Jio 5G सेवा दिवाळीपासून सुरू होईल. मुकेश अंबानी यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला Jio 5G ची सेवा दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे उपलब्ध असेल. दिवाळीपर्यंत या शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध होईल, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, देशभरात Jio 5G सेवा देण्यासाठी आणखी काही वेळ लागेल. अंबानींच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर 2023 पर्यंत कंपनी देशभरात 5G […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Reliance AGM 2022: Jio 5G सेवा दिवाळीपासून सुरू होईल. मुकेश अंबानी यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला Jio 5G ची सेवा दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे उपलब्ध असेल. दिवाळीपर्यंत या शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध होईल, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, देशभरात Jio 5G सेवा देण्यासाठी आणखी काही वेळ लागेल. अंबानींच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर 2023 पर्यंत कंपनी देशभरात 5G सेवा सुरू करेल. एजीएम दरम्यान, मुकेश अंबानी म्हणाले की कंपनीने रिलायन्स जिओ 5 जी सेवेसाठी पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत.

5G स्पेक्ट्रम लिलावादरम्यान रिलायन्सने जास्तीत जास्त स्पेक्ट्रम विकत घेतले

विशेष म्हणजे 5G स्पेक्ट्रम लिलावादरम्यान रिलायन्सने जास्तीत जास्त स्पेक्ट्रम विकत घेतले आहेत. मुकेश अंबानी म्हणाले, ‘जिओने जगातील सर्वात वेगवान 5G रोलआउटसाठी योजना तयार केली आहे’ अंबानींच्या मते, 2023 च्या अखेरीस Jio ची 5G सेवा भारतातील प्रत्येक शहर, तालुका आणि तहसीलपर्यंत पोहोचेल. ते म्हणाले की Jio 5G सेवा सर्व लोकांना आणि सर्व ठिकाणांना जोडेल.

Jio 5G प्लॅन?

हे वाचलं का?

    follow whatsapp