MBBS ची विद्यार्थिनी दोन आठवड्यांपासून मुंबईतून बेपत्ता, तिच्यासोबत सेल्फी घेतलेला तरूण म्हणतो…
मुंबईतल्या पालघरजवळ असणाऱ्या बोईसर या ठिकाणी राहणारी मेडिकल स्टुडंट सदिच्छा साने बेपत्ता झाली आहे. तिला बेपत्ता होऊन दोन आठवडे झाले आहेत. मात्र तिचा काहीही शोध लागू शकलेला नाही. तसंच तिच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. रत्नागिरीतल्या समुद्रात नौका बेपत्ता, सहा खलाशांसोबत पाच दिवस संपर्क नाही ज्या तरूणासोबत तिचा सेल्फी सापडला आहे त्या तरूणाचं म्हणणं आता […]
ADVERTISEMENT

मुंबईतल्या पालघरजवळ असणाऱ्या बोईसर या ठिकाणी राहणारी मेडिकल स्टुडंट सदिच्छा साने बेपत्ता झाली आहे. तिला बेपत्ता होऊन दोन आठवडे झाले आहेत. मात्र तिचा काहीही शोध लागू शकलेला नाही. तसंच तिच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.
रत्नागिरीतल्या समुद्रात नौका बेपत्ता, सहा खलाशांसोबत पाच दिवस संपर्क नाही
ज्या तरूणासोबत तिचा सेल्फी सापडला आहे त्या तरूणाचं म्हणणं आता समोर आलं आहे. मुंबईतल्या बँडस्टँड या भागातून ती बेपत्ता झाली आहे. 29 नोव्हेंबरच्या दिवशी सदिच्छा मेडिकलची प्रीलीम असल्याने गेली होती. ती अद्याप सापडू शकलेली नाही. सदिच्छा सानेचं अपहरण झालं असावं असा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
सदिच्छा सानेचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो आहे. त्याचप्रमाणे बांद्रा परिसरात तिचे फोटोही लावण्यात आले आहेत. सदिच्छाने तिला बॉयफ्रेंड आहे असं सांगितल्याचा दावा तिच्यासोबत सेल्फी काढणाऱ्या तरूणाने केला आहे. सदिच्छा सानेसोबत मितू सिंह या तरूणाने सेल्फी काढला होता. मितू सिंह याने केलेला हा दावा सदिच्छाच्या कुटुंबीयांनी खोडून काढला आहे.