तलवारीने केक कापणं पडलं महागात, बर्थ-डे बॉयसह एकाला पोलिसांनी केली अटक

कांदीवली पोलिसांची कारवाई, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
तलवारीने केक कापणं पडलं महागात, बर्थ-डे बॉयसह एकाला पोलिसांनी केली अटक

मुंबईत एका तरुणाला तलवारीने आपल्या बर्थ-डे सेलिब्रेट करणं चांगलंच महागात पडलं आहे. सोशल मीडियावर तलवारीच्या सहाय्याने केक कापतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कांदीवली पोलिसांनी बर्थ-डे बॉयसह त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ जानेवारीच्या दिवशी कांदीवली येथील रघुलीला मॉलच्या समोर २२ वर्षीय आरोपी सिलम सुब्रमण्यम हा आपल्या साथीदारांसह आपला वाढदिवस साजरा करत होता. यावेळी त्याच्या मित्रांनी आणलेले तीन केक आरोपीने तलवारीच्या सहाय्याने कापले. केक कापून झाल्यानंतर या तरुणांनी आरोपीच्या डोक्यावर अंडी फोडली.

कांदीवली पोलिसांना याबद्दलची माहिती कळताच त्यांनी तात्काळ सूत्र उचलत दोघांना ताब्यात घेतलं. यावेळी चौकशीत आरोपी सुब्रमण्यमला ही तलवार कौसर मेजर खान या तरुणाने आणून दिल्याचं कळलं. पोलिसांनी तात्काळ सुब्रमण्मयसह कौसर खानलाही अटक केली असून पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in