मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांसाठी गूड न्यूज! आता, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार... कसं असेल वेळापत्रक?
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आत्तापर्यंत एसी लोकल आल्याने लोकांचा प्रवास थोडा सुखकर झाला होता. मात्र हार्बर रेल्वेच्या प्रवाशांसाठी मात्र ही सुविधा अद्याप सुरू झालेली नव्हती. पण आता हार्बर रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी
आता, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार...
कसं असेल वेळापत्रक? सविस्तर जाणून घ्या
Mumbai News: मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्क ही मुंबईकरांची लाइफलाइन असल्याचं म्हटलं जातं. येथून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. याच रेल्वे नेटवर्कच्या हार्बल मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आत्तापर्यंत एसी लोकल आल्याने लोकांचा प्रवास थोडा सुखकर झाला होता. मात्र हार्बर रेल्वेच्या प्रवाशांसाठी मात्र ही सुविधा अद्याप सुरू झालेली नव्हती. पण आता हार्बर रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे.
हार्बर लाइनवर पहिली एसी लोकल धावणार
प्रवाशांसाठी हार्बर मार्गावर एसी (AC) लोकल ट्रेन सेवा सुरू होणार असून हा प्रवास अधिक आरामादायी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या 26 जानेवारीपासून ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, हार्बर लाइनवर पहिली एसी लोकल धावणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. सीएसएमटी (CSMT) किंवा वडाळा रोड ते पनवेल मार्गावर एकूण 14 एसी लोकल फेऱ्या धावणार आहेत. हार्बर मार्गावर यापूर्वी 1 डिसेंबर 2021 रोजी पहिल्यांदा एसी लोकल सुरू करण्यात आली होती. मात्र सामान्य लोकलच्या तुलनेत एसी लोकलचे तिकीट आणि पास दर अधिक असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळाला.
हे ही वाचा: मुंबईचा शिवसेनेचा महापौर करण्यासाठी वेगळी गणितं जुळवणार का? उद्धव ठाकरे म्हणाले..
कसं असेल वेळापत्रक?
नव्या वेळापत्रकानुसार, सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी एक सेवा असेल. तसेच, मध्य रेल्वे मार्गावर 16 एप्रिल 2025 पासून 14 अधिक एसी सेवा जोडल्या आहेत, ज्यामुळे आठवड्याच्या दिवसातील मुख्य मार्गावरील एसीची संख्या 66 वरून 80 झाली आहे. सोमवार ते शनिवार दरम्यान वाशी ते वडाळा रोड, सीएसएमटी (CSMT) ते पनवेल, सीएसएमटी (CSMT) ते वाशी, वडाळा रोड ते पनवेल या मार्गांवर सात अप आणि सात डाउन अशा एकूण 14 लोकल फेऱ्या धावणार आहेत. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी एसी लोकल फेऱ्या रद्द राहतील. त्याऐवजी सामान्य लोकल फेऱ्या धावतील.










