मुंबई अन् पुणे महानगरपालिकेत विजय मिळवताच मंत्रिमंडळाची बैठक, देवेंद्र फडणवीसांचे 10 धडाकेबाज निर्णय
Maharashtra cabinet decisions : अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या १ हजार ९०१ पदांच्या आकृतीबंधास व संचालनालयाचे नाव अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय करण्यास मान्यता. जिल्हा नियोजन समित्या, सहआयुक्त (नियोजन), विभागीय आयुक्त कार्यालय, मानव विकास कार्यक्रम, वैधानिक विकास मंडळ, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, नक्षलवाद विशेष कृति आराखडा कक्ष यांच्या कार्यालयांसाठी आवश्यक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध. (नियोजन विभाग)
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई अन् पुणे महानगरपालिकेत विजय मिळवताच मंत्रिमंडळाची बैठक
देवेंद्र फडणवीसांचे 10 धडाकेबाज निर्णय
Maharashtra cabinet decisions : महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल शुक्रवारी (दि.16) हाती आले. या निवडणुकीत मुंबई-पुणे आणि पिंपरी चिंचडवसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजप आणि महायुतीने विजय मिळवलाय. दरम्यान, निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आज (दि.17) मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ते सविस्तरपणे जाणून घेऊयात..
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या १ हजार ९०१ पदांच्या आकृतीबंधास व संचालनालयाचे नाव अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय करण्यास मान्यता. जिल्हा नियोजन समित्या, सहआयुक्त (नियोजन), विभागीय आयुक्त कार्यालय, मानव विकास कार्यक्रम, वैधानिक विकास मंडळ, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, नक्षलवाद विशेष कृति आराखडा कक्ष यांच्या कार्यालयांसाठी आवश्यक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध. (नियोजन विभाग)
अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्षभर सवलत देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. वाहनधारकांना दिलासा (नगर विकास विभाग)
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा – २ (एमयुटीपी -२) साठी सुधारित खर्चास व शासन हिस्सा उचलण्यास मंजुरी. (नगर विकास विभाग)










