1200 मराठी कादंबऱ्या लिहिणारे रहस्य कथाकार गुरूनाथ नाईक काळाच्या पडद्याआड

1200 मराठी कादंबऱ्या लिहिणारे रहस्य कथाकार गुरूनाथ नाईक काळाच्या पडद्याआड

1200 मराठी कांदबऱ्या लिहिणारे आणि रहस्यकथाकार म्हणून प्रसिद्ध असलेले लेखक गुरुनाथ नाईक यांचं आज पुण्यात निधन झालं आहे. बाबूराव अर्नाळकर यांच्या रहस्यकथांप्रमाणे गुरूनाथ नाईक यांनीही रहस्य कादंबऱ्यांद्वारे रंजन केलं. त्यांचाही एक वाचक वर्ग होता. आज रहस्यकथा लिहिणारा हात शांत झाला आहे. साखळी या गोव्यातील गावचे गुरूनाथ नाईक होते. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ते नोकरीनिमित्त राहिले होते. आज पुण्यात त्यांचं निधन झालं.

गुरूनाथ नाईक यांच्या निधनाने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. नाईक यांच्या कादंबर्‍यांना बाजारात चांगली मागणी होती. गुरुनाथ नाईक हे मराठीतील आघाडीचे रहस्य कथाकार होते. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नोकरीनिमित्त राहिलेले नाईक मूळचे गोव्याचे होते. गोमंतकातील सत्तरीजवळचे आडवाई साखळी हे त्यांचे मूळ गाव आणि राणे हे त्यांचे मूळ आडनाव होय.

रहस्यकथा लिहिण्यापूर्वी म्हणजे 1957 ते 1963 या काळात गुरुनाथ नाईक यांचे विविध विषयांवर लिखाण सुरू होते. या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून हेमचंद्र साखळकर आणि नाईक या नावांनी लिखाण केले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी काही संगीतिका, तर गोवा केंद्रासाठी काही श्रुतिका त्यांनी लिहिल्या आहेत.

1970 साली कामानिमित्त पुण्यात आले आसताना गुरूनाथ नाईक यांना सदानंद प्रकाशनचे खाडिलकर भेटले. त्यांनी नाईक यांना दोन रहस्यकथा लिहून देण्याची विनंती केली. नाईक यांनी क्षणाचाही विलंब न लावता हो म्हटले आणि ते कामाला लागले.

नेमका त्याच काळात ते पुण्यातील अलका चित्रपटगृहात 'किस द गर्ल्स ॲन्ड मेक देम डाय' हा इंग्रजी चित्रपट पहायला गेले. डोक्यात कथा लिहून देण्याचे विचार सुरू होते. अचानक चित्रपट अर्धवट सोडून ते उठले आणि थेट रूमवर गेले. रात्री दोन वाजेपर्यंत जागून त्यांनी ‘मृत्यूकडे नेणारे चुंबन' ही पहिली रहस्यकथा लिहून काढली.

सकाळीच ही कथा त्यांनी खाडिलकरांना सोपविली. घरी परतल्यावर 'शास्त्रज्ञाच्या मृत्यूचे गूढ' ही दुसरी रहस्यकथा तयार झाली. ती ही खाडिलकरांना सोपवून ते बेळगावला निघून गेले. थोड्याच दिवसात खाडिलकरांचे पत्र आले. तुमच्या आणि गजाननाच्या कृपेने तुमच्या दोन्ही कादंबर्‍या छापत आहोत, कृपया निघून यावे, आणि गुरुनाथ नाईक रह्स्य कादंबरीकार झाले.

गुरूनाथ नाईक यांच्या कादंबर्‍यांना बाजारात चांगली मागणी होती. महिन्याकाठी ते ७-८ कादंबर्‍या ते सहज लिहित. प्रत्येक कादंबरीच्या चार ते पाच हजार प्रति खपत. या कादंबर्‍या सरासरी शंभर पानांच्या असायच्या. अर्नाळकरांच्या कादंबर्‍याही १०० पानांच्या असत. १९७० ते १९८२ या काळात त्यांनी ७२४ रहस्य व गूढकथा लिहिल्या. यात सैनिकी जीवनावरील २५० शिलेदार कादंबर्‍या आहेत. गोलंदाज ही काल्पनिक व्यक्तिरेखा साकारून त्याच्या भोवती १५० कथा लिहिल्या. कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांची पात्रे रहस्यकथा वाचणार्‍या वाचकांच्या मनात घर करून बसली आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in