बापरे! वसईत भात गिरणी मालकाला ८० कोटींचं वीज बिल - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / बापरे! वसईत भात गिरणी मालकाला ८० कोटींचं वीज बिल
बातम्या

बापरे! वसईत भात गिरणी मालकाला ८० कोटींचं वीज बिल

वसईतील निर्मळ परिसरात असलेल्या एका भात गिरणी मालकाला दोन महिन्यांचं वीज बिल ८० कोटी रूपये इतके आले आहे. एवढ्या भरमसाठ रकमेचे बिल हाती आल्याने गिरणी मालकाला जबर धक्का बसला आहे. चुकीच्या नोंदींमुळे हे वाढीव बिल आल्याचा आरोप गिरणी मालकाने केला आहे. गणपत नाईक असं या भात गिरणी मालकाचं नाव आहे. त्यांना आलेल्या ८० कोटींच्या बिलावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी हे झोपेत बिल पाठवतात का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

८१ वर्षीय गणपत नाईक हे गेल्या २० वर्षांपासून भात गिरणीचा व्यवसाय चालवतात. त्यांचा मुलगा सतीश याचा दोन महिन्यापूर्वी मृत्यू झाला. भात गिरणीतले वीज मीटर हे मुलाच्या नावे आहे. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून कसंतरी सावरत असतानाच ८० कोटींचं बिल पाठवून महावितरणने गणपत नाईक यांना नवा धसका दिला आहे. गणपत नाईक यांना ८० कोटी १३ लाख ८९ हजार ६०० रुपयांचे बिल महावितरणने पाठवले आहे. यामुळे नाईक यांना चांगलाच धक्का बसला आहे.

एकीकडे कामगार मिळत नाहीत तर दुसरीकडे भात पिकाचे नुकसान होतं आहे. या सगळ्याला कंटाळून गणपत नाईक यांनी भात गिरणी बंदच ठेवली आहे. तरीही एवढ्या मोठ्या रकमेचे बिल आल्याने हे कुटुंब प्रचंड तणावात आहे.

“वीज बिल पाहिल्यानंतर मला धक्काच बसला. आधी कुणीतरी सांगितलं ८ लाखांचं बिल आहे, मग वाटलं ८ कोटींचं बिल पाठवलं आहे त्यानंतर बिल नीट पाहिल्यावर कळलं की ८० कोटींचं बिल आलं आहे. ते पाहून मला घामच फुटला एवढ्या मोठ्या रकमेचं बिल कसं काय पाठवलं? असा प्रश्न मला पडला. मला धक्का बसून काही झालं असतं तर त्याची जबाबदारी कुणी घेतली असती?” असाही प्रश्न गणपत नाईक यांनी विचारला आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एवढं बिल मला आलं आहे असंही गणपत नाईक यांनी स्पष्ट केलं.

आमच्या कुटुंबाला हे बिल आल्याचा मानसिक त्रास प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाला. माझे सासरे वयस्कर आहेत. बिल आल्यानंतर ते दुपारभर सगळी बिलं चाळत बसले होते, आपण वीजेचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणावर केला नसताना इतकं भरमसाठ रकमेचं बिल कसं काय आलं याचीच माझे सासरे चिंता करत होते. त्यांना शेवटी संध्याकाळी दवाखान्यात घेऊन जावं लागलं त्यांना काही झालं असतं तर कुणी जबाबदारी घेतली असती? असा प्रश्न गणपत नाईक यांची सून प्रतिभा नाईक यांनी विचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 + four =

ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटरची बायको अभिनेत्रींपेक्षाही ग्लॅमरस WTC फायनलपूर्वी स्टार क्रिकेटरची निवृत्तीची घोषणा ‘या’ तरुणीला पाहून तुम्ही व्हाल थक्क, म्हणाल ही तर… चाळीशी ओलांडून देखील अभिनेत्री ‘सिंगल’,कोण आहेत ‘या’ Actress? ‘या’ अभिनेत्रीने खरेदी केलं तब्बल 190 कोटींचं घर? Train Accident: सर्वात भयंकर ट्रेन अपघात, फोटो पाहून आपणही हादरून जाल! Isha Ambani चा रॉयल बंगला! प्रत्येक कोपरा हिऱ्यासारखा चकाकणारा.. MS Dhoni ने चाहत्यांची ‘ही’ इच्छा केली पूर्ण! Viral Video पाहिलात का? निसा देवगनसोबत ‘हा’ तरूण आहे तरी कोण?, Photo Viral Sanya Malhotra : 31 वर्षीय अभिनेत्रीला इम्पोस्टर सिंड्रोमने ग्रासले, सांगितला अनुभव! Anemia : शरीरात असेल रक्ताची कमतरता.. तर खा फक्त ‘हे’ फळ! ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी जे मुलं असूनही अनाथांचे झाले ‘मायबाप’ Malaika Arora च्या प्रेग्नेंसीवरून अर्जुन भडकला! कारण.. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे ‘गागाभट्ट’ कोण? IND-AUS : WTC फायनलमध्ये ड्रॉ झाली तर, विजेता कोण ठरणार? शिवराज्याभिषेक म्हणजे काय? shiv Rajyabhishek 2023 : 350 वर्षापूर्वी किल्ले रायगडावर घडला होता इतिहास Sonakshi Sinha : …अन् सलमान खानने तिचं नशीबच बदलून टाकलं आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय 30 किलो वजन घटवलं, अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक