राणेंनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं ! संतोष परब हल्ला प्रकरणातील आरोपीलाच जिल्हा बँकेचं अध्यक्षपद

भाजपचे मनिष दळवी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, अतुल काळसेकरांना उपाध्यक्षपद
राणेंनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं ! संतोष परब हल्ला प्रकरणातील आरोपीलाच जिल्हा बँकेचं अध्यक्षपद
विजयी उमेदवार मनिष दळवींचं अभिनंदन करताना भाजप कार्यकर्ते

महाविकास आघाडी विरुद्ध नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निमीत्ताने रंगलेल्या या सामन्याची अखेरीस काल सांगता झाली आहे. महिनाभर या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल करत महाविकास आघाडीने राणेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला खरा, परंतू राणेंनी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावत १९ पैकी ११ जागा जिंकत जिल्हा बँक आपल्याकडेच राखली आहे.

या विजयानंतर नारायण राणेंनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळल्याचं बोललं जातंय. संतोष परब हल्ला प्रकरणात आरोपी असलेल्या भाजपच्या मनिष दळवींना राणेंनी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. मनिष दळवी यांच्यावर हल्ल्यातील कटात सहभागी झाल्याचा आरोप आहे.

विजयी उमेदवार मनिष दळवींचं अभिनंदन करताना भाजप कार्यकर्ते
गिरे तो भी टांग उपर...सामना अग्रलेखातून शिवसेनेच्या भाजपला कानपिचक्या

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाच या हल्ल्यातील आरोपीला अध्यक्षपद देत राणेंनी सेनेला आव्हान दिल्याची चर्चा सध्या सिंधुदुर्गात आहे.

महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी व्हिक्टर डॉन्टस आणि उपाध्यक्षपदासाठी सुशांत नाईक यांनी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वंदना खरमळे यांनी काम पाहिले. ही प्रक्रिया जिल्हा बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयात पार पडली. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर राणेंच्या उमेदवारांनी यात बाजी मारली.

अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा ११-७ अशा फरकाने पराभव केला. महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदासाठी विक्टर डांटस यांनी अर्ज केला होता आणि अर्ज केला होता. शिवसेना आणि नारायण राणे यांच्या वादामुळे जिल्हा बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. राणेंनी जिल्हा बँकेत सत्ता मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला होता. अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होताच नारायण राणे हे जिल्हा बँकेत दाखल झाले. यावेळी बोलत असताना नारायण राणेंनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन करत नाव न घेता अजित पवारांनाही टोला लगावला.

नारायण राणे म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठं मोठी लोक आली. फार काय काय बोलली. ती जिल्ह्यात अक्कल सांगायला आली होती. आज त्यांना अकलेचे धडे मिळाले असतील. आतापर्यंत जेवढ्या निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली जिंकून दिल्या गेल्या, त्या विजयी झालेल्या सर्वांनीच चांगल काम केले आहे. फक्त एक अपशकुन झाला. तो एका व्यक्तीचा केला. त्यालाही आपण पळवून लावले आहे. हा अपशकुन गद्दार निघाला. त्याची आता लपाछपी चालू आहे. तो जिल्ह्यात उघड मानेने फिरू शकत नाही. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा आणि माझा काही सबंध नाही. जिल्हा बँकेकडून संस्थेसाठी कर्ज काढले आहे. वर्षाला ७ ते ८ कोटी रुपये व्याज भरतोय. गोरगरीबांचे प्रश्न सुटावे म्हणून जिल्हा बँकेवर माझा अंकुश होता."

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in