NASA च्या ‘पर्सिव्हरन्स रोव्हर’चे मंगळावर यशस्वी लँडिंग

मुंबई तक

अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात होती की नाही या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी हाती घेतलेल्या मोहीमेचा एक यशस्वी टप्पा पूर्ण झाला आहे. १८ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजल्याच्या दरम्यान NASA च्या पर्सिव्हरन्स रोव्हरचं मंगळवारी यशस्वी लँडिंग करण्यात आलं आहे. नासाचं जेजरो क्रेटर या मंगळावरील दुर्गम भागात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात होती की नाही या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी हाती घेतलेल्या मोहीमेचा एक यशस्वी टप्पा पूर्ण झाला आहे. १८ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजल्याच्या दरम्यान NASA च्या पर्सिव्हरन्स रोव्हरचं मंगळवारी यशस्वी लँडिंग करण्यात आलं आहे. नासाचं जेजरो क्रेटर या मंगळावरील दुर्गम भागात हे रोव्हर उतरवण्यात आलं आहे.

मंगळवार जिवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासाने महत्वाची मोहीम हाती घेतली होती. सात महिन्यांपूर्वी हे रोव्हर मंगळावर पाठवण्यात आलं होतं. यानिमीत्ताने अमेरिका हा देश मंगळावर सर्वाधिक रोव्हर पाठवणारा पहिला देश ठरला आहे.

नासाचं रोव्हर मंगळावर लँड झाल्यानंतर पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. मंगळावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी हे रोव्हर माती व दगडाचे नमुने गोळा करणार आहे.

पर्सिव्हन्स रोव्हर पुढची काही वर्ष मंगळावरच राहणार आहे. या काळात जीवसृष्टीचा अभ्यास हे रोव्हर करणार असून मंगळावरील नमुने गोळा केल्यानंतर हे रोव्हर पृथ्वीवर परतणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यकाळात माणसाला मंगळावर जाता येईल का या प्रश्नाचं मोठं उत्तर मिळणार आहे असं नासाने म्हटलंय.

हे वाचलं का?

    follow whatsapp