नवाब मलिक तुम्हाला जनता माफ करणार नाही! अमृता फडणवीस यांचा करारा जवाब

सामाजिक हेतूने केलेल्या कामावर जाणीवपूर्वक चिखलफेक केली जाते आहे असंही अमृता फडणवीस म्हणाल्या
नवाब मलिक तुम्हाला जनता माफ करणार नाही! अमृता फडणवीस यांचा करारा जवाब

आज अमृता फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांनी काही आरोप केले आहेत. त्या आरोपांना आता अमृता फडणवीस यांनी खरमरीत शैलीत उत्तर दिलं आहे. जर माझ्या अंगावर कुणी आलं तर मी त्याला सोडणार नाही असंही अमृता फडणवीस म्हणाल्या. आमच्याकडे काहीच नाही जे नवाब मलिक एक्स्पोज करू शकतात. त्यामुळे ते असे घाणेरडे आरोप करू शकत आहेत. मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही कारण नसताना नवाब मलिक यांच्याकडून चिखलफेक केली जाते आहे असंही अमृता फडणवीस म्हणाल्या. तसंच जनता तुम्हाला यासाठी कधीही माफ करणार नाही असंही त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

माझा संपर्क रॅली फॉर रिव्हर्स ही मोहीम राबवणारे सदगुरु यांच्याशी झाला. सदगुरु यांच्या मोठ्या कार्यक्रमात मी सहभागी झाले होते. तेथे मी एक वक्ता होते. त्यानंतर सदगुरु यांच्यासोबत सचिन गुप्ता आणि जयदीप राणा यांना आऊटसोअर्स करण्यात आलं. हे दिग्दर्शक आणि अशिष्टंट होते. या दोघांनी सदगुरु यांच्यासाठी गाणं तयार केलं. या गाण्यावर सर्व बॉलिवूडने गाणं म्हटलं. हे गाणं रिव्हर्र मार्चवाल्यांना आवडलं. याच दोघांना नंतर रिव्हर मार्चने आऊटसोअर्स केलंसचिन गुप्ता यांनी दिग्दर्शन केलं तर रॅली फॉर रिव्हर मार्चवाल्यांनी सर्व रेकॉर्डिंग फ्रीमध्ये ठेवलं. कोणीही या गाण्यासाठी पैसा घेतला नाही. या गाण्यात शाहरुख, सलमान यांना आणलं असतं पण यामध्ये कोळी बांधव,डेबवाले आहेत. मला तसेच रिव्हर मार्चच्या लोकांमध्ये राजकीय महत्वाकांक्षा नाही असं आज अमृता फडणवीस म्हणाल्या.

'आम्ही जनजागृती केली आणि आज आम्हालाच लाथ मारली जाते. आम्हाला कोणतीही राजकीय अभिलाषा नाही. त्यांच्या मागे हात धुवून लागलात हे कोणतं राजकारण आहे. तुम्हाला राजकारण करायचं आहे.बिगडे नवाब व्हायचं आहे ? तुम्ही बिगडे नवाबची एनर्जी सुधरे नवाबमध्ये कन्व्हर्ट करा. तरच महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो' असा सल्लाही अमृता फडणवीस यांनी दिला आहे.

'मला वाटतं की नवाब मलिक यांनी त्यांच्या जावायला विचारावं की कोण कोणाच्या पाठीशी आहे. मी एवढंच सांगेन बेनकाब नवाब भी होता है, और वह जरूर होगा. ही केवळ वेळेची गोष्ट आहे. जेव्हा एखाद्याला काही सुचत नाही, एखाद्यामध्ये नकारात्मकता आलेली असते, खराब विचार असतात तेव्हा तो सगळं खराबच पाहतो किंवा खराब करायचा प्रयत्न करतो. तुम्ही मर्द आहात ना तर थेट त्यांच्यावर निशाणा साधा, मला मध्ये आणू नका. माझ्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जातं आहे. मी माझे केवळ विचार मांडते आणि एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून ते करत राहील. कुणीही ते थांबवू शकत नाही. असंही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. आम्ही ठरवलं असतं तर शाहरुख, सलमानलाही घेऊ शकलो असतो. मात्र आमच्या बदनामीसाठी नवाब मलिक यांनी असे फोटो ट्विट केले आहेत असंही अमृता फडणवीस म्हणाल्या. महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही हे लक्षात ठेवा असंही त्या म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in