आर्यन खानचं अपहरण करून 25 कोटींच्या खंडणीचा मोहीत कंबोजचा खेळ एका सेल्फीने बिघडवला-नवाब मलिक
आर्यन खानचं अपहरण करून खंडणी वसुलीचा मोहीत कंबोजने कट रचला होता. समीर वानखेडे आणि मोहीत कंबोज यांचे चांगले संबंध आहेत. आर्यन खानला अडकवायचं, त्या बदल्यात 25 कोटी रूपये मागायचे. त्यानंतर 18 कोटीमध्ये डील पक्की झाली. मोहीत कंबोजने हा सगळा खेळ रचला होता असा आरोप आता नवाब मलिक यांनी केला आहे. ड्रग्जचा व्यवसाय जोरात चालू ठेवायचा […]
ADVERTISEMENT

आर्यन खानचं अपहरण करून खंडणी वसुलीचा मोहीत कंबोजने कट रचला होता. समीर वानखेडे आणि मोहीत कंबोज यांचे चांगले संबंध आहेत. आर्यन खानला अडकवायचं, त्या बदल्यात 25 कोटी रूपये मागायचे. त्यानंतर 18 कोटीमध्ये डील पक्की झाली. मोहीत कंबोजने हा सगळा खेळ रचला होता असा आरोप आता नवाब मलिक यांनी केला आहे. ड्रग्जचा व्यवसाय जोरात चालू ठेवायचा हाच समीर वानखेडेंचा उद्योग आहे. त्याद्वारे फिल्म जगतातील लोकांना ट्रॅप मध्ये अडकवायचं आणि कोट्यवधी वसूल करायचे हा समीर वानखेडेंचा खेळ आहे असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
आर्यन खानला प्रतीक गाभा आणि आमीर फर्निचरवाला यांनी बोलावलं होतं. त्याने क्रुझचं तिकिट काढलं नव्हतं. आर्यनचं अपहरण करून 25 कोटींची खंडणी मागण्याचा खेळ सुरू झाला. एका सेल्फीने सगळा खेल बिघडवला हे वास्तव आहे. आर्यन खानच्या अपहरणाचा कट मोहित कंबोजने रचला होता. समीर वानखेडे आणि मोहीत कंबोज यांचे चांगले संबंध आहेत असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
एक महिन्यापूर्वी म्हणजेच 6 ऑक्टोबरला मी काही खुलासे केले होते ते तुम्हाला माहित आहे. 2 ऑक्टोबरला कॉर्डिलिया क्रूझवर एनसीबीने छापा मारला आणि बातमी आली की एका मोठ्या स्टारच्या मुलाला ताब्यात घेतलं गेलं आहे. 3 ऑक्टोबरला आर्यन खानसह आठजणांना अटक केल्याची बातमी समोर आली. त्यानंतर मी 6 तारखेला व्हीडिओचे पुरावे दाखवत हे सगळं प्रकरण म्हणजे बनाव आहे हे समोर आणलं होतं असंही नवाब मलिक यांनी आज सांगितलं. के. पी. गोसावी आणि मनिष भानुशाली या दोघांचा व्हीडिओ मी त्यावेळी दाखवले होते.
हाय प्रोफाईल आरोपींना हे दोघे खेचत एनसीबी कार्यालयात का घेऊन जात आहेत असा प्रश्न मी विचारला होता. त्यावेळी ज्ञानेश्वर सिंग म्हणून एनसीबीचे अधिकारी समोर आले त्यांनी हे सांगितलं की आमचे ९ स्वतंत्र साक्षीदार या प्रकरणात आहेत. माझ्यावर तेव्हा आरोप कऱण्यात आले की मी पूर्वग्रह दुषित दृष्टीकोनातून आरोप केले आहेत. मात्र त्यावेळी मी जावयाबद्दल जेव्हा मला विचारलं गेलं तेव्हाच मी बोललो होतो. 13 जानेवारीला माझ्या जावयाला अटक केली होती. त्यानंतर 14 ताऱखेला मी ट्विट केलं होतं की देशाच्या न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे.