मोठी बातमी ! वाझेंच्या सोसायटीमधलं ते CCTV फुटेज NIA च्या ताब्यात

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA च्या हातात महत्वाचा पुरावा हाती लागला आहे. सचिन वाझे यांच्या ठाणे येथील साकेत सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेज NIA च्या हाती लागलं आहे. मनसुख हिरेन यांच्याकडे असलेली स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेल्यानंतर ती वाझे यांच्याकडे होती आणि ही कार वाझेंनी आपल्या सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये ठेवल्याचा NIA ला संशय होता. या पार्श्वभूमीवर NIA ने काल रात्री Crime Intelligence Unit च्या कार्यालयात छापे मारले.

या छापेमारीत NIA ने लॅपटॉप, फोन, साकेत सोसायटीमधल्या सीसीटीव्ही फुटेजचा DVR ताब्यात घेतला आहे. सचिन वाझे यांनी आपल्या सोसायटीमधील सीसीटीव्हीचा DVR काढून घेतला होता. याव्यतिरीक्त सचिन वाझे यांच्या केबिनमधून अनेक महत्वाची कागदपत्र NIA च्या हाती लागलेली आहेत. आतापर्यंत या प्रकरणातला हा सर्वात मोठा पुरावा NIA च्या हाती लागल्याचं बोललं जातंय.

NIA ने काल रात्रीपासून सुरु केलेली छापेमारी सकाळपर्यंत सुरु होती. यादरम्यान NIA ने सात पोलीस अधिकाऱ्यांचा जवाब नोंदवला आहे. ज्यात ACP नितीन अलकनुरे, पोलीस निरीक्षक मिलींद काथे, API रियाझ काझी, API प्रकाश होवळ आणि ३ कॉन्स्टेबलचा समावेश आहे. NIA ने यादरम्यान एक मर्सिडीज गाडीही ताब्यात घेतली असून या गाडीचा मालक नेमका कोण आहे याची चौकशी आता केली जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाझेंच्या सोसायटीमधील CCTV फुटेज त्यांच्याच टीमने कसं मिळवलं? जाणून घ्या याबाबतची नेमकी घटना

सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश ओव्हाळ, पोलिस नाईक युवराज शेलार आणि पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी देसले हे सुरुवातीला साकेत सोसायटी येथे पोहचले.

ADVERTISEMENT

तेव्हा त्यांनी तपासाकामी सोसायटीतील CCTV फुटेज पाहिजे असं सोसायटी कार्यालयातील सदस्यांना सांगितलं. पण याबाबत लेखी पत्र दिल्याशिवाय आम्ही असं काहीच करु शकत नाही. असं सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं.

ADVERTISEMENT

त्यामुळे या पोलीस अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणारं एक पत्र सोसायटी पदाधिकाऱ्यांना दिलं होतं.

पाहा त्या पत्रात नेमकं काय म्हटलं होतं:

‘सेक्शन 41 CRPC कलमानुसार आम्ही साकेत सोसायटीला ही नोटीस देतोय की, मुंबई क्राईम ब्रांच CIU DCB CID MUMBAI यांनी रजिस्टर केलेल्या क्राइम रजिस्टर 40/21 गुन्ह्यानुसार कलम 286, 465, 473, IPC 120 (B), INDIAN EXPLOSIVE ACT 4 (a)(b)(i) गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यांत तपासकामी आम्हाला आपल्या साकेत सोसायटीच्या सर्व CCTV कॅमेऱ्याचे फुटेज पाहिजे. त्यानुसार आपल्या इमारतीतील 2 DVR हे आम्हास घेऊन जायचे आहेत. या नोटीसीनुसार आम्ही आपल्याला CCTV फुटेज द्यायचे आदेश देत आहोत.’ असं या पत्रात म्हटलं आहे.

या पत्राच्या शेवटी CIU DCB CID युनिटचे साहय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी यांनी सही केली आहे आणि दोन डीव्हीआर CCTV फुटेज जप्त करुन नेले.

सीसीटीव्ही फुटेजसंबंधी काही महत्त्वाचे प्रश्न

1. आता प्रश्न हा उपस्थित होतो की, सचिन वाझे यांच्याच घरचे CCTV फुटेज या CIU टीमने का जप्त केले?

2. CCTV फुटेज कोणाच्या सांगण्यावरून CIU टीमने घेतलं ताब्यात?

3. या CCTV फुटेजचं नेमकं काय करण्यात आलं?

4. हा सर्व प्रकार सचिन वाझे यांच्यासह त्यांचे वरिष्ठ पोलीस उपायुक्त तसेच पोलीस सह आयुक्त यांना माहिती होता का?

असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. दरम्यान, आता सोसायटीचं पत्र हाती आल्याने वाझेंचा पाय आणखी खोलात गेला आहे.

दरम्यान, CIU पाठोपाठ महाराष्ट्र दहशतवादी विरोधी (ATS) पथक देखील वाझेंच्या सोसायटीच्या CCTV फुटेज संदर्भात चौकशी करण्यासाठी १४ मार्चला आलं होतं. मात्र CIU टीमने ते फुटेज आधीच नेलं असल्याने एटीएस पथकाच्या हाती काहीच लागलं नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT