नित्यानंद हिंदूंना देतोय कैलासाचं नागरिकत्व, करावं लागेल फक्त एक काम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nityananda is giving citizenship of Kailasa : सध्या बलात्काराच्या आरोपावरून फरार असलेला नित्यानंद (Nityanand) आपल्या तथाकथित देश कैलासाचे (Kailasa citizenship) नागरिकत्व वाटप करत आहे. यासाठी लोकांना व्हेरिफाईड सोशल मीडिया (Verified Social media accounts) अकाउंटवरून पोस्ट शेअर करून नागरिकत्व घेण्याचे आवाहन केले जात आहे. यामध्ये लोकांना सांगितले जात आहे की जर तुम्ही हिंदू धर्माचे पालन करत असाल किंवा हिंदू (Hindu) विचारधारा असलेल्या गटात सामील व्हायचे असेल तर तुम्ही कैलासाचे ई-नागरिकत्व मोफत घेऊ शकता. हे घेऊन तुम्ही जागतिक हिंदू कुटुंबाचा भाग बनू शकता, असं सांगितलं जात आहे. giving citizenship of Kailasa to Hindus, only one thing has to be done

कैलासाच्या अधिकृत अकाऊंटवरून नागरिकत्वाबाबत अनेक ट्विट करण्यात आले आहेत. नागरिकत्वासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक पेज उघडेल. यामध्ये पहिल्या कॉलममध्ये नाव, नंतर ई-मेल, पत्ता, शहर, राज्य, देश, व्यवसाय आणि नंतर फोन नंबर असे पर्याय आहेत. नागरिकत्व घेण्यासाठी ही सर्व माहिती मागवली जात आहे.

आरोपी नित्यानंदने तर कहरच केलाय, काल्पनिक ‘कैलासा’ देशाची प्रतिनिधी थेट युनोत!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अशा प्रकारे कैलासाचे नागरिकत्व घेता येईल, असा दावा कैलासच्या वेबसाईटवर केला जात आहे. मात्र, नागरिकत्व घेतल्यावर कैलासात कसे पोहोचता येईल आणि तिथेच स्थायिक कसे होता येईल, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

ADVERTISEMENT

कैलासा बनवायची गरज का पडली?

बलात्काराचा आरोप झाल्यानंतर नित्यानंद घाबरून देश सोडून पळून गेला. त्याला फरारी घोषित करण्यात आलं. यानंतर त्याने दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर या देशात जाऊन जमिनीचा तुकडा विकत घेतला आणि तो आपला देश म्हणून घोषित केला. देशाला ‘कैलासा’ असे नाव देण्यात आले. नित्यानंद त्याला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणतो. कैलासाच्या वेबसाईटचा दावा आहे की या देशात छळलेल्या हिंदूंना जगभरातून संरक्षण दिले जाते. येथे राहणारे हिंदू जात, लिंग असा कोणताही भेद न करता शांततेने राहतात. स्वतःची रिझर्व्ह बँक, स्वतःचे चलन आणि स्वतःचे स्वतंत्र संविधान असल्याचा दावाही केला जातो.

ADVERTISEMENT

Bageshwar Baba विरोधात संताप! मनसे आक्रमक, अंधारेंचा फडणवीसांवर हल्ला

कोण आहे नित्यानंद?

नित्यानंदचा जन्म 1 जानेवारी 1978 रोजी तामिळनाडूमध्ये झाला. त्याच्या वडिलांचे नाव अरुणाचलम आणि आईचे नाव लोकनायकी आहे. नित्यानंद याने 1992 मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले.

1995 मध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केले. असा दावा केला जातो की वयाच्या 12 व्या वर्षापासून त्याने रामकृष्ण मठात शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

1 जानेवारी 2003 रोजी नित्यानंद याने बंगळुरूजवळील बिदादी येथे पहिला आश्रम उघडला. त्यानंतर त्याने अनेक आश्रम उघडले.

2010 मध्ये नित्यानंदवर फसवणूक आणि अश्लीलतेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची एक सेक्स सीडी समोर आली होती. या प्रकरणात नित्यानंदला अटकही झाली होती, मात्र काही दिवसांतच त्याला जामीन मिळाला.

2012 मध्ये नित्यानंद याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये पुन्हा त्याच्यावर दोन मुलींचे अपहरण करून त्यांना बंदिस्त ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT