नित्यानंदच्या कैलासाने अमेरिकेतील 30 शहारांना गंडवलं, प्रकरण काय?

मुंबई तक

Kailasa Country In america : बलात्कार-अपहरण यांसारख्या गंभीर प्रकरणातील आरोपी आणि भारतातून फरार असलेला नित्यानंद (Nityanand) आता अमेरिकेसाठी डोकेदुखी बनला आहे. स्वयंघोषित देव आणि काल्पनिक देश कैलासाचा संस्थापक, नित्यानंद याने अमेरिकेतील 30 शहरांमध्ये फसवणूक केली आहे. या फसवणुकीचे सत्य समोर आल्यानंतर आता नित्यानंदची चौकशी का केली नाही याचा पश्चाताप त्यांना होत आहे. (Nityananda’s Kailasa fooled […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Kailasa Country In america : बलात्कार-अपहरण यांसारख्या गंभीर प्रकरणातील आरोपी आणि भारतातून फरार असलेला नित्यानंद (Nityanand) आता अमेरिकेसाठी डोकेदुखी बनला आहे. स्वयंघोषित देव आणि काल्पनिक देश कैलासाचा संस्थापक, नित्यानंद याने अमेरिकेतील 30 शहरांमध्ये फसवणूक केली आहे. या फसवणुकीचे सत्य समोर आल्यानंतर आता नित्यानंदची चौकशी का केली नाही याचा पश्चाताप त्यांना होत आहे. (Nityananda’s Kailasa fooled 30 cities in America, what’s the matter?)

सिस्टर सिटी कराराबाबत हे बनावटगिरीचे प्रकरण समोर आले आहे. वास्तविक, हा करार कोणत्याही दोन देशांतील दोन शहरांमधील होतो. यामुळे या शहरांमधील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंध दृढ होतात. अमेरिकेबद्दल बोलायचे तर ड्वाइट डेव्हिड आयझेनहॉवर 1955 मध्ये निवडणूक जिंकून अमेरिकेचे अध्यक्ष बनले. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेची सत्ता हाती घेतलेल्या आयझेनहॉवर यांनी सिस्टर सिटीज इंटरनॅशनल (SCI) च्या रूपाने पुढाकार घेतला.

अमेरिकेच्या या सिस्टर सिटी कराराचा फायदा फरार नित्यानंदनेही घेतला. एका अहवालानुसार, नित्यानंदने त्याच्या ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा’ द्वारे 30 हून अधिक अमेरिकन शहरांशी सिस्टर सिटी करार केले आहेत. कराराच्या शहरांमध्ये नेवार्क, रिचमंड, व्हर्जिनिया, डेटन, ओहायो, बुएना पार्क आणि फ्लोरिडा सारखी महत्त्वाची यूएस शहरे समाविष्ट आहेत.

आरोपी नित्यानंदने तर कहरच केलाय, काल्पनिक ‘कैलासा’ देशाची प्रतिनिधी थेट युनोत!

हे वाचलं का?

    follow whatsapp