अब तक 14… एक-दोन नव्हे तर तब्बल 14 महिलांशी लग्न, लग्नाचा ‘WORLD RECORD’ पण..
भुवनेश्वर (ओडिशा): सध्याच्या काळात एक संसार निभावणं हे अनेकांना अवघड जात आहे. तर दुसरीकडे भारतात एक अशी व्यक्ती आहे ज्याने एक, दोन नव्हे तर तब्बल 14 लग्नं केली असल्याचं समोर आलं आहे. ओडिशातील एका व्यक्तीने चक्क ‘लग्नाचा विक्रम’ केला आहे. त्याने एकूण 14 लग्नं केली आहेत आणि ती देखील 7 वेगवेगळ्या राज्यांमध्ये. पण आता याच […]
ADVERTISEMENT

भुवनेश्वर (ओडिशा): सध्याच्या काळात एक संसार निभावणं हे अनेकांना अवघड जात आहे. तर दुसरीकडे भारतात एक अशी व्यक्ती आहे ज्याने एक, दोन नव्हे तर तब्बल 14 लग्नं केली असल्याचं समोर आलं आहे. ओडिशातील एका व्यक्तीने चक्क ‘लग्नाचा विक्रम’ केला आहे. त्याने एकूण 14 लग्नं केली आहेत आणि ती देखील 7 वेगवेगळ्या राज्यांमध्ये. पण आता याच त्याच्या कारनाम्यांमुळे तो प्रचंड अडचणीत आला आहे. जाणून घ्या याबाबत सविस्तरपणे.
एवढी लग्नं का केली?
54 वर्षीय बिधू प्रकाश स्वैन उर्फ रमेश स्वैन याला साधासुधा नाही तर चक्क लग्न करण्याचा शौक आहे. रमेश हा लग्न करण्यासाठी विविध मॅट्रिमोनियल साइटचा वापर करायचा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 30 ते 40 वयोगटातील अविवाहित महिलांना टार्गेट करायचा. त्यापैकी बहुतांश घटस्फोटित महिला होत्या. रमेश हा अशा महिलांशी लग्न करुन त्यांचा विश्वास संपादन करायचा. पण नंतर तो त्यांच्याकडूनच पैसे उकळायचा. आरोपी रमेश हा मूळचा ओडिशाच्या केंद्रपारा जिल्ह्यातील असून तो बहुतांश वेळा ओडिशाच्या बाहेरच राहत होता.










