Omicron : ओमिक्रॉन व्हेरिएंट खूपच धोकादायक; नव्या अभ्यासात समोर आली महत्त्वाची माहिती
ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) दिवसेंदिवस कोरोना (Corona) संकट अधिक गहिरं होत चालंल आहे. त्यामुळेच या नव्या व्हेरिएंटविषी जास्तीत जास्त माहिती गोळा करण्यासाठी संशोधक अहोरात्र प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या अभ्यासातून या व्हेरिएंटबाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. आता या व्हेरिएंटबाबत हाँगकाँग विद्यापीठाचा एक नवीन स्टडी समोर आला आहे. या स्टडीमध्ये जो निष्कर्ष काढण्यात आला […]
ADVERTISEMENT

ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) दिवसेंदिवस कोरोना (Corona) संकट अधिक गहिरं होत चालंल आहे. त्यामुळेच या नव्या व्हेरिएंटविषी जास्तीत जास्त माहिती गोळा करण्यासाठी संशोधक अहोरात्र प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या अभ्यासातून या व्हेरिएंटबाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. आता या व्हेरिएंटबाबत हाँगकाँग विद्यापीठाचा एक नवीन स्टडी समोर आला आहे. या स्टडीमध्ये जो निष्कर्ष काढण्यात आला आहे तो नक्कीच चिंता वाढवणारा आहे. त्यात असं म्हटलं गेलं आहे की, हा व्हेरिएंट डेल्टापेक्षाही 70 पट अधिक वेगाने पसरतो.
मात्र, यामध्ये दिलासादायक बाब अशी आहे की, या नवीन व्हेरिएंटमुळे लोक गंभीररित्या आजारी पडत नाहीत. दक्षिण आफ्रिकेच्या डॉक्टरांना मिळालेल्या डेटावर हा अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टाला आणि मूळ कोविड -19 स्ट्रेनच्या तुलनेत सुमारे 70 पट वेगाने पसरतो.
अभ्यासातील निष्कर्षात काय म्हटलंय?
स्टडीत असे आढळून आले की, संसर्गानंतर 24 तासांनंतर ओमिक्रॉन श्वसन प्रणालीमध्ये खूप वेगाने पसरतो. संशोधकांच्या टीमचे म्हणणे आहे की, कोरोनाचे नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन हा फुफ्फुसांमध्ये त्याच्या मूळ स्वरूपापेक्षा 10 पट कमी प्रतिकृती बनवते, जे ‘कमी तीव्र’ असल्याचे दर्शवते.