राजकारण करायला उभा जन्म पडलाय, पण... शिवसेनेनं भाजपला सुनावलं! - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / राजकारण करायला उभा जन्म पडलाय, पण… शिवसेनेनं भाजपला सुनावलं!
बातम्या

राजकारण करायला उभा जन्म पडलाय, पण… शिवसेनेनं भाजपला सुनावलं!

मुंबई: कोरोना संकट राज्यात थैमान घालत असताना विरोधी पक्षाकडून याबाबत मात्र राजकारण सुरु असल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे. राजकारण करायला उभा जन्म पडला आहे. त्यामुळे विरोधकांनी निदान कोरोना संकटाबाबत तरी जरा जपून वागावं, बोलावं. असा सल्ला सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. ‘कोरोनाचा विषाणू किती धोकादायक आहे हे एम्सच्या संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे. त्यामुळे एम्सचे संचालक देशाला गुमराह करीत आहेत असं महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी दिल्लीत जाऊन एम्सच्या दारात जोरदार आंदोलनं केली पाहिजेत.’ असा टोला देखील सामनातून हाणला आहे.

पाहा सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

  • ‘कोरोना’ चा धुमाकूळ पुन्हा सुरू झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. नव्हे, ती आता जाताना दिसत आहे. ‘ एम्स ‘ सारख्या सर्वोच्च वैद्यकीय संस्थांनी धोक्याची जाणीव करून दिली. ‘एम्स ‘ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, हे महाराष्ट्रातील विरोधकांनी समजून घेतले पाहिजे, असं म्हणत पुन्हा लॉकडाऊन टाळायचा असेल तर लोकांनी जबाबदारीने वागावे. विरोधी पक्षांनीही जबाबदारीचे भान राखावे. विरोधकांनो, निदान कोरोना संकटाबाबत तरी जरा जपून वागा, बोला. राजकारण करायला उभा जन्म पडला आहे, पण कोरोनाने संधी दिली तर! तेव्हा काळजी घ्या!

  • निर्बंध सैल केल्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. अशा प्रसंगी राजकारण न करता सरकार तसेच विरोधकांनी जनतेचे हित सांभाळावे, एकोप्याने काम करावे असे संकेत आहेत, पण मुख्यमंत्र्यांनी ‘लॉकडाऊन’बाबत इशारा देताच विरोधी पक्षनेते दरेकर यांनी वेगळेच टोकाचे विधान केले, ”राज्यात लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करू नका. जुलमी राजवटीसारखी कृती करू नका.” दरेकर यांच्या विधानाचा अर्थ चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार वगैरे तज्ञ मंडळींना तरी समजला काय? कोरोना संसर्गाबाबत सत्यस्थिती समोर मांडणे याला काय दहशत पसरवणे म्हणायचे?

  • राज्यात कोरोनाची दुसरी लाट धडक मारते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. राज्यात गेल्या 24 तासांत सात हजारांवर नवे रुग्ण झाले. नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, वर्धा जिह्यांत कोरोना वेगाने पसरतो आहे. शेवटी मुख्यमंत्र्यांना समोर येऊन सगळ्यांनाच कडू औषधाचा डोस पाजावा लागला. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, लोकांनी शिस्त, नियम पाळावेत. राज्यात ‘लॉक डाऊन’ लावायचे की नाही, याचा निर्णय पुढील आठवडय़ात घेऊ.

  • महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याची माहिती ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. या नव्या स्ट्रेनमुळे ‘हर्ड इम्युनिटी’ मिळवणे आणखी कठीण असल्याची भीती डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केली. यापूर्वी कोरोनाच्या अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा केरोनाचे संक्रमण होण्याचा धोका असल्याचे डॉ. गुलेरिया सांगत आहेत. कोरोनावरील लस ही नव्या स्ट्रेनविरोधात पुचकामी आहे हे जे डॉ. गुलेरिया तळमळीने सांगत आहेत, तो काय दहशत माजविण्याचा प्रकार आहे? ‘एम्स’चे संचालक देशाला गुमराह करीत आहेत, असे महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी दिल्लीत जाऊन ‘एम्स’च्या दारात जोरदार आंदोलन केले पाहिजे. देशाचे आरोग्यमंत्रीच काय, पंतप्रधान, राष्ट्रपतींचे उंबरठे झिजवून निषेधाची पत्रे दिली पाहिजेत.

ही बातमी वाचलीत का?: ठाकरे सरकारमधील 26 मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण, पाहा यादी

  • मुख्यमंत्री बोलत आहेत, लोकांना धोका समजावून सांगत आहेत म्हणून टीका करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी द्रोह करणे किंवा त्यांना कोरोनाच्या खाईत लोटण्यासारखे आहे. मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्याचे स्वागत विरोधकांनी का करू नये? जनता जेवढी सत्ताधारी पक्षाची असते तेवढी ती विरोधी पक्षांचीसुद्धा आहे. लॉक डाऊनमुळे लहान व्यापारी, नोकरदार वर्ग, हातावर पोट आहे अशांचे कंबरडे मोडणार हे नक्की. आर्थिक व्यवस्थाही कोसळणार आहेच. त्यासाठी मार्ग काढावा लागेल व केंद्राने त्याकामी मदत करणे गरजेचे आहे.

  • महाराष्ट्रासारख्या राज्याला या कामी केंद्राकडून एखादे विशेष आर्थिक पॅकेज मिळायला हवे. असे आर्थिक पॅकेज मिळावे म्हणून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनीही मोदी यांच्याकडे तगादा लावला तरी आमची हरकत नाही. राज्यातील विरोधी पक्ष हा काही पाकिस्तानी किंवा अफगाणी वंशाचा नाही. तो याच मातीतला आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा, देवेंद्र फडणवीस, दरेकर, आशिष शेलार वगैरे मंडळींनी दिल्लीतच ठाण मांडून बसावे व राज्याच्या वतीने एक-दोन हजार कोटींच्या पॅकेजसाठी लढत राहावे. राज्यातून देशाला जो मोठा महसूल मिळतो, त्यातला पुरेसा परतावा महाराष्ट्राला मिळाला तर विरोधी पक्षाला सरकारकडून जे करून घ्यायचे आहे, त्याचा मार्ग मोकळा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 2 =

अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट! Shruti Marathe च्या घायाळ करणाऱ्या अदांवर, चाहते फिदा! साधं राहणीमान असणाऱ्या Ratan Tata कडे आहेत ‘या’ खास वस्तूचं कलेक्शन Swara Bhaskar ने दिली Good News! शेअर केले खास Photo