ठाकरे सरकारमधील 26 मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण, पाहा यादी

मुंबई तक

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना आज (22 फेब्रुवारी) कोरोनाची लागण झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील जवळजवळ 60 टक्के मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षापासून कोरोनाचा संसर्ग सुरु झाला आहे. जो अद्यापही कायम आहे. अशावेळी राज्य सरकारमधील 43 पैकी एकूण 26 मंत्र्यांना लागण […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना आज (22 फेब्रुवारी) कोरोनाची लागण झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील जवळजवळ 60 टक्के मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

मागील वर्षापासून कोरोनाचा संसर्ग सुरु झाला आहे. जो अद्यापही कायम आहे. अशावेळी राज्य सरकारमधील 43 पैकी एकूण 26 मंत्र्यांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. सध्या कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना दुसरीकडे गेल्या आठवडाभरात राज्यातील 5 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. छगन भुजबळ यांच्यासह जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना देखील दुसर्‍यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना बसला आहे. राष्ट्रवादीच्या 16 पैकी 13 मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर काँग्रेसचे 7, शिवसेनेचे 5 आणि एका अपक्ष मंत्र्यांला कोरोनाची लागण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि याशिवाय संजय बनसोडे आणि राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांना देखील या कोरोना व्हायरसच्या सामना करावा लागला आहे.

ही बातमी पाहिलीत का?: महाराष्ट्रातील ‘या’ पाच जिल्ह्यात कोरोना पसरतोय हातपाय!

काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण (पीडब्ल्यूडी), नितीन राऊत (ऊर्जा) अस्लम शेख (वस्त्रोद्योग), वर्षा गायकवाड (शालेय शिक्षण), सुनील केदार (क्रीडा व युवा व्यवहार), राज्यमंत्री विश्वजीत कदम, सतेज पाटील हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, कृषिमंत्री दादा भुसे, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना देखील कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे.

पाहा आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची यादी

  1. अजित पवार

  • जयंत पाटील

  • छगन भुजबळ

  • अनिल देशमुख

  • अशोक चव्हाण

  • राजेंद्र शिंगणे

  • राजेश टोपे

  • हसन मुश्रीफ

  • नितीन राऊत

  • वर्षा गायकवाड

  • जितेंद्र आव्हाड

  • एकनाथ शिंदे

  • सुनील केदार

  • उदय सामंत

  • दादाजी भुसे

  • बाळासाहेब पाटील

  • अनिल परब

  • अस्लम शेख

  • धनंजय मुंडे

  • दिलीप वळसे-पाटील

  • बच्चू कडू

  • विश्वजित कदम

  • सतेज पाटील

  • संजय बनसोडे

  • प्राजक्त तनपुरे

  • अब्दुल सत्तार

  • हे वाचलं का?

      follow whatsapp